झूम : सेल्टॉस : नवा लूक, प्रीमियम फील

कियाने ‘ऑल टाईम फेवरेट’ आणि भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सी-एसयूव्ही श्रेणीतील ‘सेल्टॉस’ला नवा लूक दिला आहे. ‘प्रीमियमनेस’ हा कियाचा नेहमीच प्लस पॉईंट राहिला आहे.
seltos car
seltos carsakal

कियाने ‘ऑल टाईम फेवरेट’ आणि भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सी-एसयूव्ही श्रेणीतील ‘सेल्टॉस’ला नवा लूक दिला आहे. ‘प्रीमियमनेस’ हा कियाचा नेहमीच प्लस पॉईंट राहिला आहे. आधीची सेल्टॉसही यालाच साजेशी होती; परंतु तिचे २०२३चे ‘फेसलिफ्ट’ व्हर्जन अधिक प्रीमियम बनवून किया सेल्टॉस सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांना आपल्याकडे अधिक आकर्षक करू पाहत आहे. या कारची राईड घेतल्यानंतर हा आकर्षकपण अधिक जाणवला. यापूर्वीच्या सेल्टॉसच्या तुलनेत विविध बदल केले आहेत, जे कारची राईड अधिक सुलभ करतात.

सेल्टॉसचे एचटी, जीटी आणि एक्स-लाईन असे तीन व्हेरिएंट येतात. यामध्येही नऊ ट्रीम्स देण्यात आले आहेत. त्यापैकी ‘एचटी-एक्स प्लस’ या इंटिलिजेंट मॅन्युअल टान्समिशन (आयएमटी) गिअर बॉक्स असलेल्या डिझेल व्हेरिएंटची नुकतीच राईड केली. यात ‘आयएमटी’ हा नव्याने समाविष्ट केलेला गिअर बॉक्स असून, तो किआ ‘सोनेट’मध्येही नव्याने देण्यात आला आहे.

राइड केलेल्या सेल्टॉसच्या ‘एचटी-एक्स प्लस’ व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १८ लाख २९ हजार ९०० रुपये आहे. यामध्ये १.५ लिटरचे ‘सीआरडी आय’ व्हीजीटी ६-आयएमटी डिझेल इंजिन दिले आहे. (यामध्ये टी-जीडीआय ६-आयएमटी आणि टी-जीडीआय ७-डीसीटी असे दोन अन्य पर्यायही येतात) तसेच १४९३ सीसी क्षमतेचे इंजिन असून, जे ४००० आरपीएमला ११४.४१ बीएचपी ताकद आणि १५०० ते २७५० आरपीएमला २५० एनएम टॉर्क जनरेट करते. पेटर ऑलिव्ह (Pewter Olive) हा नवीन रंगाचा पर्याय सेल्टॉसमध्ये उपलब्ध झाला आहे.

वाहनविश्वात एक समज आहे, की पेट्रोल इंजिन डिझेल इंजिनच्या तुलनेत कामगिरीत उजवे असते. सेल्टॉसच्या बाबतीत हा समज दूर होतो. सेल्टॉसच्या पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्हींच्या राइडचा अनुभव यापूर्वी घेतला आहे. आधीच्या तुलनेत इंजिन अधिक रिफाइंड असून, परिस्थितीनुरूप ते कामगिरी बजावते. हवी तशी ताकद देण्याबरोबरच एक्सेलरेशनला तात्काळ वेग पकडण्यातही तिची हातोटी आहे. सामान्यतः डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनच्या तुलनेत आवाज करते. सेल्टॉसमध्येही इंजिन नॉईज असला, तरी त्याचा कामगिरीवर परिणाम जाणवला नाही.

सेल्टॉसची रायडिंग क्वालिटी पूर्वीप्रमाणेच असून, स्टेअरिंगची हाताळणी तुलनेत थोडी जड झाल्यासारखी वाटली. याकडे थोड्याफार प्रमाणात दुर्लक्ष केल्यास टील्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील, ८ प्रकारे खाली-वर होणारे चालकाचे आसन यामुळे दृश्यमानतेत त्रास होत नाही. अधिक लवचिक कॉईल स्प्रिंग सस्पेन्शनमुळे कोणतेही तीव्र धक्के जाणवत नाहीत. सहप्रवाशांनाही कारमध्ये बसल्यानंतर ‘गच्चपणा’ वाटत नाही. अगदी पाठीमागील रांगेत तीन प्रौढ व्यक्ती आरामात बसू शकतात. सेल्टॉसच्या ‘एचटी-एक्स प्लस’ व्हेरिएंटमध्ये ड्रायव्हिंग मोड, ३६० डिग्री कॅमेराची उणीव जाणवते.

सौंदर्याला ‘चार चाँद’

सेल्टॉसच्या पुढील ग्रीलची रचना, हेडलाईट, टेललाईट आणि साइड प्रोफाईल, एजेसमध्ये बदल करण्यात आले आहेत. १७ इंची टायर सेल्टॉसला अधिक भारदस्त बनवतात. त्यावरील क्रिस्टल कट ॲलॉय व्हील्स सौंदर्याला ‘चार चाँद’ लावतात. राइडसाठी दिलेल्या ‘पेटर ऑलिव्ह’ रंगाच्या कारला अतिरिक्त ॲक्सेसरीज लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे कार अधिक उठावदार दिसत होती. दरवाजा उघडताच आतील प्रीमियमनेस नजरेत भरणारा होता. डॅशबोर्ड, दरवाजांवरील रंगसंगती समप्रमाणात होती. कुठेही त्यात ‘ओव्हर कलरिंग’ वाटले नाही.

काही फीचर्समध्ये बदल...

१०.२५ इंची इन्फोटन्मेंट सिस्टिम, स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग, फ्रंड व्हेंटिलेटेड सिट्स, अल्ट्राव्हायोलेट कटसह सोलर ग्लास, ८ स्पीकरसह ‘बोस’ कंपनीची प्रीमियम साऊंड सिस्टिम, ड्युअल पॅनेल पॅनोरमिक सनरूफ, किलेस एन्ट्री, ड्युअल झोन एसी, क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, फॉलो मी होम हेडलँप, ६ एअर बॅग्ज, पार्किंग सेन्सर, चारही चाकांना डिस्क ब्रेक, एबीएस+ईबीडी, ब्रेक आसिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com