Toyota Hyryder: इंधन कार्यक्षम ‘हायरायडर हायब्रिड’

इंधनाचे वाढते दर वाहनमालकांच्या खिशावर अधिक भार टाकतात. त्यामुळे कोणत्याही वाहनासाठी इंधन कार्यक्षमता अत्यंत महत्त्वाची असते.
Toyota hyryder price and features
Toyota hyryder price and featuressakal

Toyota Hyryder: इंधनाचे वाढते दर वाहनमालकांच्या खिशावर अधिक भार टाकतात. त्यामुळे कोणत्याही वाहनासाठी इंधन कार्यक्षमता अत्यंत महत्त्वाची असते. तथापि, खिशाला परवडणाऱ्या, स्टाईल, मजबुती आणि कामगिरीतही तोडीस तोड असलेल्या कार नेहमीच पसंतीस उतरतात.

टोयोटाची ‘हायरायडर हायब्रीड’ ही सी-सेगमेंट एसयूव्ही कार नक्कीच त्या श्रेणीत उतरते. या आधी हायरायडरच्या ‘निओ ड्राईव्ह व्ही’ या माइल्ड हायब्रिड व्हेरिएंटची राईड केली होती; परंतु तुलनेत हायराडर हायब्रीडच्या राईडिंगचा अनुभव आणि मिळालेले मायलेज उत्तम होते.

इलेक्ट्रिक कारबाबत अनेक जण आजही विचार करतात. चार्जिंग स्टेशन्सची उपलब्धता, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, बॅटरीबाबत मनात साशंकता असल्याने अनेक जण ही वाहने खरेदी करावी की नाहीत, या बुचकळ्यात सापडतात.

अशांसाठी ‘हायब्रिड’ अर्थात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक मोटरवर धावणाऱ्या कार योग्य पर्याय आहेत. त्यातही टोयोटाने कारच्या दर्जाबाबत ग्राहकांमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. हायरायडर हायब्रीडची राईड केल्यानंतर टोयोटाने हा दर्जा कायम राखल्याचे जाणवले.

एसयूव्ही श्रेणीतील एखाद्या कारच्या इंधनाची टाकी पूर्ण भरल्यानंतर ती जास्तीत जास्त सरासरी १४ ते १६ च्या प्रतिकिमी मायलेजने ५५० ते ६५० किलोमीटर धावू शकते.

हायरायडर हायब्रिड मात्र सर्वप्रकारच्या रस्त्यांवर सरासरी २० किमी प्रतिलिटरच्या मायलेजने ७५० ते ८०० किलोमीटर धावली. म्हणजे तिने महामार्गावर २३ ते २५ चे प्रतिलिटर मायलेज दिले. शहरी/ ग्रामीण रस्त्यांवर १७ ते १८ चे मायलेज दिले. म्हणून हायब्रिड कार खिशाला परवडू शकतात त्या यासाठीच.

हायराडयर हायब्रिड सरासरी ११४ बीएचपी ताकद निर्माण करते. ही कार बहुतेक वेळा इलेक्ट्रिक मोडवर धावते त्यात अधिक ‘आरपीएम’वर (रिव्हॉल्युशन पर मिनिट) वर चालवल्यास पेट्रोलवर; तर कमी आरपीएममध्ये चालवल्यास इलेक्ट्रिक मोटरवर धावते.

कारच्या इन्स्ट्रूमेंट क्लस्टर तसेच ऑडोमीटरमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाचे काम कसे चालते याचे चित्र दिसते. ड्रायव्हिंग स्टाईलनुसार हायरायडर हायब्रीड मायलेज देते. ठराविक वेगमर्यादेत चालवल्यास ती नक्कीच मायलेजच्या बाबतीत नाराज करत नाही.

हायरायडरचे इंजिन स्पेसिफिकेशन

टोयोटा हायरायडर ‘हायब्रिड व्ही’ व्हेरिएंटमध्ये ३ सिलिंडर, १४९० सीसी इंजिन दिले असून जे ५,५०० आरपीएमला ९१.१८ बीएचपी ताकद, ४४०० ते ४८०० आरपीएमला १२२ एनएम टॉर्क निर्माण करते.

तसेच यामध्ये १७६ व्होल्ट्सची लिथियम आयन बॅटरी, एसी सिन्क्रोनस मोटर दिली असून जी ३,९९५ आरपीएमला ८०.२ पीएस ताकद आणि तेवढ्याच आरपीएमला १४१ एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार ० ते १०० वेग १२.५ सेकंदात घेते. या कारची मुंबई, पुण्यातील ऑनरोड सरासरी किंमत १२.९४ ते २३.६५ लाख रुपये इतकी आहे.

Toyota hyryder price and features
10% GST On Diesel Cars: कंपन्यांचे शेअर्स घसरताच नितीन गडकरींचा यू-टर्न! म्हणाले...

लुक आणि राईडिंग

हायरायडर कार टोयोटाची ''मिनी फॉर्च्युनर'' म्हणूनही ओळखली जाते. तिचा बॉक्सी लूक, १७ इंची टायर, ग्रीलची डिझाईन, हेडलँप-फॉगलँप, टेललँपची रचना, रूफरेल्स आदी कारच्या डिझाईनमध्ये समतोलपणा राखतात.

हायरायडरच्या ड्रायव्हिंग सिटवर बसल्यानंतर फॉर्च्युनरचा फीलही येतो. समोर दिसणारे बोनेट, आपल्या उंचीनुसार ॲडजस्ट होणारे सीट्स, पाठीमागील दृष्यमानता आणि एकूणच तिची हाताळणी एका टिपिकल एसयूव्हीची आठवण करून देते. इंजिन पूर्ण रिफाईन्ड असल्याने राईड करताना विशेषत: शहरी रस्त्यांवर एखाद्या पॉवरफूल कार राईडिंगचा फील येतो.

Toyota hyryder price and features
New Car खरेदी करताय? मग या टिप्स वापराल तर होईल मोठी बचत

कोणकोणते फीचर्स?

६ एअर बॅग, पाठीमागे थ्री पॉईंट सीटबेल्ट, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रुब्युशन (ईबीडी), ब्रेक आसिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड/डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्रायव्हर सिट हाईट ॲडजस्ट सिस्टिम, किलेस सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड सेफ्टी लॉक, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग ॲडजस्टमेंट, किलेस स्टार्ट/स्टॉप, ३६० डिग्री कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर, पॅनॉरमिक सनरूफ, ऑटोमेटिक हेडलँप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉईड ऑटो/ॲपल कार प्ले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com