
अलका कुबल
आई होण्याची चाहूल लागली, तेव्हा माझं आयुष्य अत्यंत व्यग्र होतं. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या यशानंतर माझ्या करिअरने जोर धरला होता. त्या काळात मी एका वर्षाला ११-१२ चित्रपट करत होते. आई होणार असं कळलं, तेव्हा माझं ‘वध चक्र’ या गोव्यात चित्रित होणाऱ्या टेलिफिल्मचं काम सुरू होतं. या वेळी माझ्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. मी स्पष्ट केलं होतं, की मी गरोदर आहे आणि माझ्यासोबत काम करण्यासाठी वेळेचं बंधन पाळावं लागेल. सातव्या-आठव्या महिन्यापर्यंत मी काम केलं.