Pregnancy Piles Treatment : महिलांमध्ये प्रसुतीनंतर मुळव्याध उद्भवण्याचं प्रमाण जास्त? लक्षणे वेळीच ओळखा सावध व्हा!  

शौचाच्या जागेवर होणारा कुठलाही त्रास हा मूळव्याध नसतो
Pregnancy Piles Treatment
Pregnancy Piles Treatmentesakal
Updated on

Pregnancy Piles Treatment : गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. तसेच प्रसूतीपूर्वी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र प्रसूतीनंतर सर्व काही सुरळीत होईल, असा लोकांचा विश्वास आहे. महिलेचे शरीर गर्भधारणेपूर्वीच्या स्थितीत परत येईल. पण तसे होत नाही. प्रसुतीनंतरही हे बदल सुरूच राहतात.

अनेक स्त्रियांना बाळंतपणानंतर मूळव्याध होतो. गर्भधारणेपूर्वी स्त्रीला मूळव्याध नसला तरी गरोदरपणात पोटाच्या समस्येमुळे प्रसूतीनंतर मूळव्याधाचा आजार होण्याचा धोका वाढतो. मात्र गरोदरपणात महिलांनी ही समस्या टाळण्यासाठी उपाय योजले तर मूळव्याधाची समस्या टाळता येते.

Pregnancy Piles Treatment
काळे डाग दूर करण्यासाठी वापरा हे तेल, सोपा घरगुती उपाय! Skin Care

मूळव्याध म्हणजे काय?

शौचाच्या जागेवर होणारा कुठलाही त्रास हा एकट्या मूळव्याधीच्या सदरात मोडत नाही, हा ही लोकजागृतीचा विषय आहे. अनेक वेळा ती साधी फिशर म्हणजे चीर असू शकते, जी थोड्याफार उपाय योजनांनी सहजरीत्या बरी होऊ शकते. या व्याधीत संडासला त्रास होणे, संडास कडक होणे, संडासला लागून रक्त पडणे, संडासच्या वेळी व काही अंशी त्यानंतरही आग होत राहणे, अशी लक्षणे दिसतात.

मूळव्याधामुळे मलाशयाच्या सभोवतालच्या मज्जातंतूंमध्ये जळजळ होते. असामान्य सूज आणि ढेकूळ समस्यांमुळे आतड्यांसंबंधी हालचालींदरम्यान खाज सुटणे आणि वेदना होते. मूळव्याधाचा आकार बाहेरच्या बाजूला पसरलेल्या लहान पुरळासारखा असतो.

Pregnancy Piles Treatment
Skin Care Tips : लग्नात प्रितीसारखं कडक दिसा? त्यासाठी फक्त हे करा

गरोदरपणात मुळव्याध का वाढतो?

  • गरोदरपणात, शरीरात प्रोजेस्टेरॉनची वाढ होते त्यामुळे शिरा शिथिल होतात आणि त्यांना सूज येते.

  • प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे बद्धकोष्ठता सुद्धा होते कारण त्यामुळे आतड्यांच्या हालचाली मंदावतात.

  • बद्धकोष्ठता झाल्यास तुम्हाला शौचाच्या वेळेस त्रास होतो. ह्या ताणामुळे गरोदरपणात मूळव्याध होऊ शकतो किंवा प्रसूतीनंतर मूळव्याधीचा त्रास जास्त वाढू शकतो.

  • गर्भाशयाचा आकार जसजसा वाढत जातो तसतसे ओटीपोटाच्या भागातील नसांवर (इंफेरीअर व्हेना कावा) दबाव येतो. इंफेरीअर व्हेना कावा ही एक मोठी नस आहे, ही नस आपल्या शरीराच्या खालच्या भागातून रक्त घेते. गर्भाशयाच्या खाली असलेल्या शिरा दाबल्या जातात आणि मोठ्या होतात.

  • प्रसूतीच्या वेळी जास्त जोर दिल्याने देखील मूळव्याध होऊ शकतो.

Pregnancy Piles Treatment
Pregnancy : वयाच्या तिशीनंतर प्रेग्नंसीत येतात या अडचणी, घ्या काळजी

मूळव्याधाची लक्षणे

- मूळव्याधात गुदद्वारात वेदना, जळजळ आणि खाज येते.

- आतड्यांसंबंधी हालचाल करताना वेदना वाढतात.

- मूळव्याधामुळे बसताना, उठताना वेदना होतात.

- मूळव्याध झाल्यावर शौच साफ झाले तरी फ्रेश वाटत नाही.

- गुदाशयाजवळील ऊतींमध्ये सूज, जखम आणि रक्तस्त्राव 

Pregnancy Piles Treatment
Pregnancy : वयाच्या तिशीनंतर प्रेग्नंसीत येतात या अडचणी, घ्या काळजी

गरोदरपणात काय काळजी घ्याल

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या महिलांनी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी फळे, भाज्या आणि धान्याचे सेवन करता येते. फायबरयुक्त अन्न बद्धकोष्ठता दूर करते आणि मल मऊ ठेवते. यामुळे मूळव्याधाचा धोका कमी होतो.

शौच तटवू नका

जेव्हा तुम्हाला बाथरूममध्ये जाण्याची गरज वाटेल तेव्हा ताबडतोब शौचास जा. शौच थांबवू नका. पोट रिकामे नसेल तर गर्भाशय आणि आतड्यात त्रास होतो आणि मूळव्याधाची समस्या उद्भवू शकते.

शरीर हायड्रेटेड ठेवा

गरोदर स्त्रिया स्वत:ला हायड्रेटेड ठेवतात. यासाठी भरपूर पाणी प्यावे. नारळ पाणी, लिंबूपाणी आणि फळांचा रस यासारख्या द्रवपदार्थांचे सेवन करत रहा. यामुळे मूळव्याधाची समस्याही टाळता येते.

मुळव्याधीवर औषधे

तोंडाद्वारे घेता येणारी वेदनाशामक औषधे

प्रसूतीनंतर मूळव्याधीवर उपाय म्हणून तोंडातून घेता येणारी वेदनाशामक औषधे घेतली जाऊ शकतात. यामध्ये आयबुप्रोफेन, ऍस्पिरिन किंवा अॅसिटामिनोफेन इत्यादींचा समावेश होतो. ह्यामुळे प्रसूतीनंतरच्या मूळव्याधीचा त्रास मोठ्या प्रमाणात दूर होतो.

Pregnancy Piles Treatment
Women Health : मासिक पाळीतील रक्ताचा रंग का बदलतो ?

मूळव्याधीवर क्रीम

मुळव्याधीवरील क्रीम मुळे वेदना होणे, खाज सुटणे आणि रक्तस्त्राव ह्या सारख्या लक्षणांपासून आराम मिळतो. तुमच्या लक्षणांनुसार, लवकर आराम मिळण्यासाठी योग्य क्रीम निवडा. हायड्रोकॉर्टिसोन असलेली क्रीम्स खाज सुटण्यास मदत करतात, तर प्रमोक्सिन आणि बेंझोकेन क्रीम्स वेदनांवर प्रभावी असतात.

ऑस्मोटिक एजंट किंवा स्टूल सॉफ्टनर्स

स्टूल सॉफ्टनर हे स्टूल मऊ ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही आणि ताण देखील टाळला जातो. डोक्यूसेट (१०० मिग्रॅ ते ३०० मिग्रॅ) एक आठवड्यासाठी दररोज घेण्याची शिफारस केली जाते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com