Hair Care : पांढऱ्या केसांसाठी कढीपत्ता ठरतंय वरदान; असा करा वापरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Care tips

Hair Care : पांढऱ्या केसांसाठी कढीपत्ता ठरतंय वरदान; असा करा वापरा

चेहऱ्यावरील चमक किंवा सुरकुत्या अशा समस्या वय वाढेल तसे सुरु होतात. मग अशावेळी आपण अनेक नवनवीन प्रयोग करत असतो. सुंदर लांब केस पांढरे होणे ही समस्या अनेकांना त्यांच्या वयानुसार सतावत असते. मात्र, आजकाल अनेकांना अकाली पांढऱ्या केसांचा त्रास सुरु झाला आहे. वाढणारे प्रदूषण, ताणतणाव, आहार आणि जीवनशैलीही पांढऱ्या केसांसाठी कारणीभूत ठरतात. मात्र, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा वापरू शकता.

विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांमध्ये वापरण्यात येणारा कडीपत्ता केसांसाठी फायदेशीर ठरतो. कढीपत्त्यात 'बी' जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात असते. केसांमध्ये ते मेलामाइन देण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे केस पांढरे होण्यास अटकाव निर्माण होत असतो. हे बीटा-केराटिनचा एक समृद्ध स्त्रोत असून केस तुटण्याची समस्या दूर ठेवतो. तुम्ही याचा वापर अनेक प्रकारे करु शकता.

हेही वाचा: डेबिट, क्रेडिट कार्डचे व्यवहार आणखी सुरक्षित होणार; पुढील महिन्यापासून नियमात बदल

कढीपत्ता आणि पाणी -

15-20 कढीपत्त्याची पाने घेऊन ते दोन कप पाण्यात उकळवा. या पाण्याचे प्रमाण निम्मे होईपर्यंत उकळवून घ्या. काही वेळीने हे पाणी थोडे थंड होऊ द्या. यानंतर केसांना शॅम्पू केल्यानंतर कढीपत्त्याच्या पाण्याने केस धुवून टाक. केस सुकल्यानंतर तुम्हाला बदल जाणवेल.

खोबरेल तेलात कढीपत्ता मिसळा -

एका कढईत खोबरेल तेल गरम करून गॅस बंद करा. त्यात थोडी कढीपत्त्याची पाने टाका आणि 15 ते 20 मिनिटे ते मिश्रण तसेच सोडा. थंड झाल्यावर केसांना या तेलाने मसाज करा. आता एक ते दोन तास तेल केसांमध्ये राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही प्रक्रिया पुन्हा करा.

हेही वाचा: Maharashtra Politics : आमदारांनी विधीमंडळात चक्क पोलिस अधिकाऱ्याची धुलाई केली होती..

Web Title: Premature Greying Of Hair How To Apply For Curry Leaves And White Hair Problem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..