White Hair Remedy: कमी वयातच पांढरे केस दिससायला लागलेत? आता घरीच बनवा नॅचरल हेयर डाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

White Hair Remedy

White Hair Remedy: कमी वयातच पांढरे केस दिससायला लागलेत? आता घरीच बनवा नॅचरल हेयर डाय

Natural Hair Dye: वाढतं प्रदूषण आणि अनहेल्दी लाइफस्टाइलचा सगळ्यात जास्त प्रभाव हा केसांवर होत असतो. ज्यामुळे कमी वयातच तुमचे केस पांढरे दिसू लागतात. मग हे पांढरे केस लपवण्यासाठी अनेकजण केमिकलयुक्त हेअर डाय लावतात. यामुळे तुमचे केस आणखी खराब होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी नॅचरल हेअर डाय बनवू शकता. ज्यामुळे तुमचे केसही काळे दिसतील आणि आधीपक्षा मजबूतही होतील.

घरच्या घरी असं बनवा नॅचरल हेअर डाय

तुम्ही पांढऱ्या केसांवर उपाय म्हणून आवळा आणि शिकाकाईचा उपयोग नॅचरल डायसाठी करू शकता. यासाठी तुम्हाला खालील साहित्याची गरज होती.

हेही वाचा: Winter Health : हिवाळ्यात किवी खाण्याचे असे आहेत फायदे

साहित्य

मूठभर सुकलेला आवला

एक छोटं बाउल भरून शिकाकाई पावडर

एक कप पाणी

नॅचर हेअर डाय बनवाण्याची पद्धत

आधी लोखंडी कढईमध्ये १ कप पाणी टाकून त्याला उकळवा.

यानंतर या पाण्यात मुठभर सुकलेला आवळा आणि १ छोट्या कढईत शिकाकाई पावडर टाका.

या मिश्रणाला १० मिनीटापर्यंत उकळवा आणि त्यानंतर गॅस बंद करा.

या मिश्रणाला थंड करा आणि ही मेहेंदी ब्रशने केसांना लावा. (Health)

हेही वाचा: Health: हिवाळ्यात वजनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? फॉलो करा 'या' टिप्स

केसांसाठी आवळा फायदेशीर

आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे केसांसाठी फायदेकारी असतात. आवळ्यामध्ये केसांना आवश्यक असलेले पोषक तत्व असतात. आवळा केसांना काळे बनवण्यास फायदेकारी ठरतो.

टॅग्स :hairhair growthHair dye