- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
स्त्रियांच्या शरीरात ४०-४५ वर्षांचा वयोगट पार केल्यानंतर अनेक जैविक बदल सुरू होतात. त्यातील एक गंभीर आणि गुप्तपणे वाढणारी समस्या म्हणजे हाडांचा ठिसूळपणा. ‘ऑस्टिओपेनिया’ किंवा पुढच्या टप्प्यावर ‘ऑस्टिओपोरोसिस’ ही स्थिती महिलांमध्ये सर्रास आढळते. रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण कमी झाल्यानं कॅल्शियमचे शोषण घटते आणि हाडं कमकुवत होऊ लागतात.