
ईपीएफच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे वळते करा... अशी आहे प्रक्रिया
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यातीतल रक्कम दुसऱ्या खात्यात वळवण्याची मुभा दिली आहे. ही सुविधा खातेदारांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे. कसे ते पाहू या...
हेही वाचा: ‘ईपीएफओ’वर दोन हप्त्यांत व्याज
प्रक्रिया
सर्वात आधी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या संकेतस्थळावर जावे.
त्यानंतर UAN व पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
Online Services वर जाऊन वन मेंबर–वन EPF अकाउण्ट (ट्रांसफर रिक्वेस्ट)वर क्लिक करा.
तुमच्या सध्याच्या नोकरीचा तपशील द्या आणि ईपीएफ व्हेरिफाय करून घ्या.
Get Detailsवर क्लिक करा.
आधीच्या नोकरीचा तपशील द्या.
ऑनलाइन क्लेम फॉर्म अटेस्ट करण्यासाठी ऑथराइज्ड सिग्नेटरी होल्डिंग DSC च्या उपलब्धतेनुसार सध्याची कंपनी किंवा आधीची कंपनी यांच्यापैकी एक निवडा.
मेंबर आयडी किंवा यूएएन द्या.
‘Get OTP’वर क्लिक करा.
UANमध्ये नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर ओटीपी येईल.
ओटीपी टाकून सबमिट पर्यायावर क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करून झाल्यानंतर त्याची सेल्फ अटेस्टेड पीडीएफ १० दिवसांनी कंपनीत सादर करा. कंपनीकडून मान्यता मिळाल्यानंतर नवीन खात्यात ईपीएफ जमा केला जाईल.
Web Title: Procedure To Transfer Provident Fund Account To Another
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..