किळसवाणा प्रकार; कमोडमध्ये तयार केलं कोल्ड्रिंक अन् केली पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किळसवाणा प्रकार; कमोडमध्ये तयार केलं कोल्ड्रिंक अन् केली पार्टी

किळसवाणा प्रकार; कमोडमध्ये तयार केलं कोल्ड्रिंक अन् केली पार्टी

उन्हाळ्याच्या दिवसात कोल्ड्रिंक्स, सरबते किंवा आइस्क्रीम या पदार्थांची मागणी आपोआप वाढते. आग ओकणाऱ्या उन्हामुळे असहाय्य झाल्यावर प्रत्येक जण शितपेयाकडे आकर्षित होतो. त्यामुळे घराघरात सरबतं, कोल्ड्रिंक्स सहज पाहायला मिळतात. आता कोल्ड्रिंक्स सुद्धा अनेक फ्लेवर्स आणि विविध पद्धतीने तयार केलेल्या स्वरुपात मिळतात. मात्र, तुम्ही कधी टॉयलेटमध्ये तयार केलेलं कोल्ड्रिंक पिण्याची कल्पना केली आहे का? सहाजिकचं टॉयलेटमध्ये कोल्ड्रिंक असं म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. परंतु, असाच काहीसा विचित्र प्रयोग काही तरुणांनी केला आहे. या तरुणांनी मिळून चक्क कमोडमध्ये कोल्ड्रिंक तयार करुन ते प्यायलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणीने कमोडमध्ये बर्फ टाकून त्यावर आइस्क्रीम व अन्य खाद्यपदार्थ टाकतांना दिसत आहे. विशेष म्हणजे ती इतक्यावरच न थांबता तिने . फ्लशच्या भांड्यात फॅण्टासारखी काही शितपेये ओतली. त्यानंतर तिने फ्लश करत कमोडमध्ये जमा झालेल्या आईस्क्रीम व शितपेय एकत्र करुन ते कोल्ड्रिंक मित्रांमध्ये वाटलं.

दरम्यान, या व्हिडीओला ६.५ पेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले असून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे या तरुण मंडळींनी नेमका हा प्रकार का केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र, सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात येत आहे.