
Red alert in Pune – How to travel safely in monsoon: महाराष्ट्रात मागील गेले काही दिवसांपासून प्री-मान्सून पावसाने धुमाकुळ घातला आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. पुण्यात रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका पोहचू शकतो.
पुण्यात येत्या दोन ते तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच विंकेड आल्याने अनेक लोक ट्रिपच नियोजन करतात. अशावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.