- भाग्यश्री दळवी आणि सुमेध म्हात्रे
कधी कुठे, कशी मैत्री होईल सांगता येत नाही… काही ओळखी हळूहळू इतक्या आपल्याशा वाटू लागतात की त्यातून एक सुंदर नातं तयार होतं. अशीच काहीशी गोष्ट आहे भाग्यश्री दळवी आणि तिचा मित्र सुमेध म्हात्रे यांची. झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली भाग्यश्री आणि कॉलेजच्या इंटर्नशिपमध्ये भेटलेला सुमेध – दोघांमध्ये जुळलेलं हे नातं आजही तितकंच खास आहे.