Money Plant : मनी प्लांट लावायची सर्वात चांगली दिशा कोणती? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money Plant

Money Plant : मनी प्लांट लावायची सर्वात चांगली दिशा कोणती? जाणून घ्या

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे. घर बांधण्यापासून ते सजवण्यापर्यंत, आतून वस्तूंची मांडणी करण्यापर्यंत वास्तू खूप महत्त्वाची आहे. किचनपासून बेडरुम, वॉशरूम तसेच घरात ठेवलेल्या वनस्पतीच्य, दिशांचे महत्त्व आहे. वास्तूनुसार अशी काही झाडे आहेत, ती घरात लावल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. मात्र ही रोपे लावताना योग्य दिशा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे.

जर ही झाडे योग्य दिशेने लावली नाहीत तर घरामध्ये नकारात्मकता पसरू शकते. यापैकी एक वनस्पती म्हणजे मनी प्लांट. वास्तुशास्त्रात मनी प्लांटचे अनेक महत्त्व सांगितले आहे. मनी प्लांटशी संबंधित वास्तुशास्त्राचे काही नियम सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घराची आर्थिक स्थिती सुधारू शकता.

कोणत्या दिशेने लावणे योग्य आहे?

वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला म्हणजेच अग्निकोनात मनी प्लांट लावणे नेहमीच शुभ मानले जाते. ही दिशा शुक्र ग्रहाद्वारे दर्शविली जाते आणि या दिशेची देवता गणेश आहे. म्हणूनच या दिशेला मनी प्लांट लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. आर्थिक लाभ होतो. यासोबतच घराच्या उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला मनी प्लांट कधीही ठेवू नये.

ज्योतिषशास्त्रानुसार, ही दिशा बृहस्पति दर्शवते आणि ती शुक्राची शत्रू मानली जाते. म्हणूनच मनी प्लांट या दिशेला ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय घराच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला मनी प्लांट लावणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की या दिशेला मनी प्लांट लावल्याने व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

मनी प्लांट सुकून देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेले मनी प्लांटचे रोप कधीही सुकू नये. हे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर घरामध्ये लावलेला मनी प्लांट सुकत असेल तर त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते. म्हणूनच मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे आणि त्याची वाळलेली पाने लगेच काढून टाकावीत.

टॅग्स :lifestyle