आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना सौंदर्याची काळजी घेणं जमत नाही. मात्र चेहऱ्यासोबतच आपल्या शरीराचे इतर अवयवही स्वच्छ आणि सुंदर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये विशेषतः आपले हात आणि पाय स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असतं..अनेकदा आपण पार्लर मध्ये चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो, पण मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करणे अनेक वेळा अवघड आणि खर्चिक वाटते. मात्र, मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सहज घरच्या घरी काही मिनिटांत मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करू शकतात. घरगुती पद्धतीने केलेला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर ना की फक्त तुमच्या हातापायांची देखभाल करतो, तर ते तुमच्या मनाला देखील ताजेतवाने करतो..हिवाळ्यात पॅडिक्यूअर करणे का गरजेचे?.घरच्या घरी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्यासाठी कोणत्या वस्ती लागतील आणि कोणत्या पद्धतीने मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करावं यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगत आहोत..स्टेप1. नेलपेंट काढून टाकणेमॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्यासाठी सर्वप्रथम नखांवरील नेलपेंट रिमूव्हरच्या मदतीने पूर्ण काढून टाका.2. नखं कापणेतुम्हाला हवी असलेली लांबी आणि आकाराप्रमाणे नेलकरच्या साहाय्याने नखं कापून त्यांना शेप द्या..3. कोमट पाण्यात हातपाय भिजवाएका टबमध्ये किंवा बदलीमध्ये हातपाय बुडतील एकवड कोमट पाणी घ्या. नंतर यात एक शॅम्पो पाकीट आणि कंडिशनर टाका. यासोबतच एक अर्धा लिंबू रस टाका. व यानंतर साधारण ५-६ मिनिटं हातपाय बुडवून ठेवा. बाहेर काढल्यावर एका मऊ सुटी नॅपकिनी पुसून घ्यावे.4. घरगुती स्क्रब वापर कराघरगुती स्क्रब तयार करण्यासाठी ४ चमचे बेकिंग सोडा त्यात २ चमचा कॉफी पावडर, २ चमचा नारळाचे तेल, १ चमचा साखर आणि १चमचा लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण हातापायांना चांगलं स्क्रब करा. ५ मिनिटांसाठी हा पॅक राहू द्या. मग नंतर स्वच्छ कोमट पाण्याने हातपाय धुवा. हा पॅक वापरल्याने आपल्या हातापायांवरील टॅन झालेली स्किन निघून जाते. व त्वचा मऊ आणि चमकदार होते.5. घरगुती मास्कचा वापर कराघरगुती मास्क तयार करण्यासाठी ४ चमचे तांदळाच्या किंवा बेसनाच्या पिठात हळद आणि दही मिसळून पेस्ट तयार करा. आणि हातापायांना १० मिनिटं लावून ठेवा. नंतर हलक्या हातांनी मसाज करत कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करा..6. मॉइश्चरायझर वापराहातापायांना मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक चांगला मॉइश्चरायझर लावा. हात मसाज करतांना क्रीम हलक्या हाताने पसरवा.7. नेल पॉलिशशेवटी, आपल्या हातापायांच्या नखांवर आवडीनुसार नेल पॉलिश लावा. साधे नेल पॉलिश, पारदर्शक किंवा रंगीबेरंगी, तुमच्या आवडीनुसार निवडा..अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करू शकता. यामुळे तुमचे हातपाय मऊ आणि सुंदर चमकदार दिसू लागतील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.