
खासगी, सरकारी दवाखान्यात जन्म किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्याकडून संबंधिताच्या नोंदीसाठी अर्ज महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे ऑनलाइन पाठविला जातो. कागदपत्रांची पडताळणी करून २१ दिवसांत संबंधितांना दाखला दिला जात आहे. पण, कागदपत्रे परिपूर्ण असतील आणि समोरच्याला खूपच गरज असल्यास त्यांना एका दिवसात देखील दाखला दिला जातो. दरम्यान, जन्म दाखला देताना नवजात शिशूचे नाव एका वर्षात नोंदविण्याची मुभा आहे. त्यावेळी प्रमाणपत्रावर नाव टाकून जन्मदाखला दिला जातो.