Radhika Merchant Fitness : राधिका मर्चंटच्या सौंदर्य आणि फिटनेसचे रहस्य आहे शास्त्रीय नृत्य, जाणून घ्या त्याचे फायदे

राधिका मर्चंटच्या सौंदर्य आणि फिटनेसचे रहस्य आहे शास्त्रीय नृत्य.
Radhika Merchant Fitness : राधिका मर्चंटच्या सौंदर्य आणि फिटनेसचे रहस्य आहे शास्त्रीय नृत्य, जाणून घ्या त्याचे फायदे

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका खूप सुंदर आणि शिकलेली आहे. तिने 8 वर्षे भरतनाट्यमचा अभ्यास केला आहे आणि ती क्लासिकल इंडियन डान्सर आहे. राधिकाच्या सौंदर्यात आणि फिटनेसमध्ये डान्सचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. शास्त्रीय नृत्याचा आरोग्याला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

क्लासिक नृत्याचे फायदे

भारतात शास्त्रीय नृत्याचे विविध प्रकार प्रचलित आहेत. यामध्ये भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी आणि मणिपुरी यांचा समावेश आहे.

हे डान्स फॉर्म केल्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

भरतनाट्यमच्या डान्स मूव्हमुळे शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अनेक फायदे मिळतात. या नृत्यात प्रथम अरिमंडी पोजिशनमध्ये बसवले जाते.

ही एक बसण्याची स्थिती आहे ज्यामध्ये स्क्वाटिंग पोजिशनमध्ये बसले जाते आणि शरीर सरळ ठेवले जाते.

यामुळे शरीराचे पोषण सुधारते आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते.

यामुळे एक प्रकारचा कार्डिओ वर्कआउट होतो. त्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि रक्ताभिसरणही सुधारते.

या नृत्यामुळे हाताची चरबी कमी होण्यासही मदत होते कारण यात हातांची खूप हालचाल होते.

ओडिसी आणि कथ्थक नृत्य प्रकार देखील फिटनेस आणि स्नायूंना टोन करण्यासाठी चांगले आहेत. यामुळे शरीरात लवचिकताही वाढते.

यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते आणि तुम्ही पोटाची चरबीही सहज कमी करू शकता.

शास्त्रीय नृत्य सादर करताना अनेक प्रकारची आसने केली जातात जी रक्ताभिसरण, मज्जासंस्था आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात.

हे नृत्यप्रकार सादर करताना डोळ्यांच्या एक्सप्रेशनकडेही खूप लक्ष दिले जाते. त्यामुळे डोळ्यांचा व्यायाम होतो.

डान्स केल्याने शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास देखील मदत होते, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि शरीराला रोगांपासून देखील संरक्षण मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com