मला आठवत आहे सन २००५ मध्ये मी मुंबईमध्ये कामानिमित्त पहिल्यांदा आले, तेव्हा २६ जुलैचा पाऊस आणि त्याबद्दलच्या थरारक कथा टीव्हीवर बघितल्या होत्या आणि मुंबईत आल्यानंतर जवळच्या व्यक्तींकडून त्याबद्दलचे भयानक प्रसंगही ऐकले होते. हे ऐकून मुंबईमध्ये आपला टिकाव लागेल का, असं वाटलं होतं; परंतु इतक्या वर्षांत मुंबईचा पाऊस माझ्यासाठी सुखद ठरला.