esakal | मुलगी झाली हो! फुलांच्या पायघड्या, ढोल ताशांच्या गजरात बापाने केला जल्लोष

बोलून बातमी शोधा

मुलगी झाली हो! फुलांच्या पायघड्या, ढोल ताशांच्या गजरात बापाने केला जल्लोष

मुलगी झाली हो! फुलांच्या पायघड्या, ढोल ताशांच्या गजरात बापाने केला जल्लोष

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुलगी घरची लक्ष्मी असल्याचं कायमच म्हटलं जातं. त्यामुळे मुलींचा जन्म होणं ही शुभ घटना असल्याचा समज आहे. परंतु, अनेक ठिकाणी मुलींचा जन्म झाल्यावर आजही नाराजी व्यक्त केली जाते. त्या मुलीला आणि तिच्या आईला दुषणे लावली जातात. परंतु, काही जण असेही असतात जे घरात मुलगी जन्माला आल्यावर त्याचा मोठा जल्लोष करतात. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या स्वागतासाठी वडिलांनी चक्क ४.५ लाख रुपये खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे.

राजस्थानमधील एका कुटुंबात तब्बल ३५ वर्षानंतर पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला. त्यामुळे या कुटुंबात मोठ्या दणक्यात मुलीचं स्वागत करण्यात आलं. इतकंच नाही तर तिच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या, ढोल ताशे आणि चक्क चॉपर सज्ज होतं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीची आणि तिच्या वडिलांची जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीला पाहण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा: World Book Day: का साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन?

या चिमुकलीला हॉस्पिटलपासून ते घरापर्यंत आणण्यासाठी वडिलांनी चक्क ४.५ लाख रुपये खर्च करुन चॉपरची व्यवस्था केली होती. इतकंच नाही तर, नागौर जिल्ह्यातील निंबडी चंदावता या गावात चॉपर उतरल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवण्यात आला होता. तसंच ढोल ताशाचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, घरात ३५ वर्षानंतर मुलीचा जन्म झाल्यामुळे तिच्या आजोबांनी मदन लाल कुम्हार यांनी हा दिवस जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुलीचं स्वागत चॉपरमधूनच होईल हा निश्चय त्यांनी केला. यासाठी मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची कायदेशीरित्या परवानगी घेऊन गावात हॅलिपॅड तयार केलं. विशेष म्हणजे प्रत्येक मुलीचा जन्म हा उत्सवाप्रमाणेच साजरा केला पाहिजे असा संदेशही त्यांनी दिला.