esakal | 'राम जन्मला गं सखी राम जन्मला.. '; जाणून घ्या रामनवमीचं महत्त्व

बोलून बातमी शोधा

'राम जन्मला गं सखी राम जन्मला.. '; जाणून घ्या रामनवमीचं महत्त्व
'राम जन्मला गं सखी राम जन्मला.. '; जाणून घ्या रामनवमीचं महत्त्व
sakal_logo
By
शर्वरी जोशी

'राम जन्मला गं सखी राम जन्मला', गीत रामायणातल्या या ओळी ऐकल्या की एक वेगळीच स्फुर्ती येते. भगवान श्रीरामांचं वर्णन करणाऱ्या या गीतामध्ये अनेक गोष्टी दडल्या आहेत. आज रामनवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म दिवस. आजच्याच दिवशी दुसऱ्या प्रहराला श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. विशेष म्हणजे अजूनही देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमी मोठ्या दणक्यात साजरी केली जाते. परंतु, रामनवमी साजरी करण्यामागचं नेमकं महत्त्व काय ते अनेकांना ठावूक नाही. म्हणूनच राम नवमी का साजरी केली जाते ते पाहुयात.

आजच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये रामनवमी साजरी केली जाते. यामध्येच आयोध्येमध्ये आजच्या दिवसाचा सोहळा म्हणजे दैदिप्यमान असतो. आयोध्येत मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली आहे.

हिंदू सण- उत्सवांमधील सर्वात शुभ उत्सव म्हणून राम नवमीकडे पाहिलं जातं. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र यांना भगवान विष्णूचा सातवा अवतार असल्याचं म्हटल जातं. त्यामुळे राजा दशरथ व महाराणी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूनेच जन्म घेतल्याचं सांगण्यात येतं.

राम नवमीचं महत्त्व-

प्रभू रामचंद्रांचा जन्म त्रेता युगात सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशात झाला. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तारखेला झाला. त्यामुळे आजच्याच दिवशी रामनवमी साजरी केली जाते. आज अनेकांच्या घरी श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा सोहळा केला जातो. रामायण किंवा अन्य कथांचं पारायण केलं जातं. अनेक जण उपवासदेखील करतात.

मुहूर्त-

राम नवमी २१ तारखेला सकाळी १२.४३ वाजता प्रारंभ होऊन २२ एप्रिल दुपारी १२.३५ पर्यंत समाप्त होणार आहे.