
Ramayana Wax Museum Ayodhya
sakal
वर्षभरापूर्वी अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात आलं होतं. अनेक राम भक्त, अयोध्यवासी यामुळे अतिशय खुश होते. संपूर्ण अयोध्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली होती. या दिवाळीतही सणाच्या निमित्तासोबतच आणखी एका कारणाने अयोध्यानगरी उत्साह साजरा करत आहे. यंदाच्या दिवाळीत अयोध्येच्या आपल्या अध्यात्मिक वैभवात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. शहरामध्ये जगातील पहिले रामायण व्हॅक्स म्युझियम उभारले आहे. ज्यामध्ये ५० वॅक्स पुतळे ठेवला आहेत आणि बाल कांडापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत रामायणाची संपूर्ण कथा हुबेहूब उभारली आहे.