
Holi 2025: भारतात होळी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी म्हणजे रंगांचा सण. तसेच या सणाला होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी वेगवेगळी नावं आहेत.
होळी हा सण फाल्गुन महिन्यातल पौर्णिमेला साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दूसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलालाची होळी खेळतात. या वर्षी १३ मार्चला होलिका दहन होणार असून दूसऱ्या दिवशी होळी खेळली जाणार आहे. होळीच्या तारखेबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे की होळी कोणत्या दिवशी साजरी करायची. चला तर मग हा गोंधळ दूर करूया.