Rangpanchami 2024 : महिलांसाठी वेळ राखीव असलेली नाशिकची पेशवेकालीन रंगपंचमी इतकी खास का?

धप्पा मारून खेळली जाणारी नाशिकची रंगपंचमी असते एकदम खास
Rangpanchami 2024
Rangpanchami 2024esakal

Rangpanchami 2024 :

तूम्ही आज उठल्यापासून रंगांमध्ये भिजत असाल. मित्रांसोबत डिजे लावून रंग खेळत असाल. किंवा हलगीच्या ठेक्यावर नाचत कुटुंबासोबत रंगले असाल. सगळीकडे अशीच रंगंपंचमी साजरी होते. त्यात वेगळं काही नाही. पण असं नाहीय. आपल्याच राज्यातल्या नाशिक शहरात रंगपंचमी वेगळी असते.

Rangpanchami 2024
Nashik News: जुनी पेन्शनसाठी NMC कर्मचाऱ्यांचे मंगळवारी आंदोलन; संघटनांच्या संयुक्त कृती समितीचा निर्णय

नाशिक शहराला पेशवाकालीन रंगपंचमीची परंपरा लाभली आहे. पेशवेकालीन वेगळी रंगपंचमी साजरी करण्यासाठी आजही तिथे चौका-चौकात गर्दी होते. काय आहे ती परंपरा पाहुयात.

पेशवेकाळात रहाड रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत. जुने नाशिक, पंचवटी भागात पेशव्यांनी ठिकठिकाणी रहाडी तयार करून ठेवल्या आहेत. कालांतराने प्रत्येक रहाडीचा मान वेगवेगळ्या कुटुंबीयांना देण्यात आला. शहरात पूर्वी १६ रहाडी होत्या. सध्या त्यातील केवळ पाच रहाडी उघडल्या जातात.

Rangpanchami 2024
Rangpanchami Festival : पेशवेकालीन रहाड रंगोत्सव संस्कृती आजही टिकून; रहाड खोदण्याच्या कामास वेग

सर्वाधिक रहाडी जुने नाशिकमध्ये आहे. जुने नाशिक येथे तीवंदा चौक, जुनी तांबट गल्ली, दिल्ली दरवाजा, काझीपुरा दंडे हनुमान मंदिर समोर तसेच पंचवटी शनी चौक अशा पाच रहाडी उघडत असतात. तर सुंदरनारायण मंदिर परिसर, सरदार चौक, राममंदिर, मधली होळी, रोकडोबा तालीम, भद्रकाली भाजी मार्केट, फुले मार्केट, कठडा शिवाजी चौक, डिंगरअळी चौक या भागातील रहाडी अनेक वर्षापासून बंद आहे.

रहाडींचे रंगही ठरलेले असतात

प्रत्येक रहाडीचे रंग ठरलेले आहेत. दिल्ली दरवाजा येथील रहाडीत केसरी, तिवंदा पिवळा, जुनी तांबट गल्ली केसरी, शनी चौक गुलाबी, काझीपुरा केसरी असे रंग आहेत. काझीपुरा आणि दिल्ली दरवाजा येथील रहाडींमध्ये फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. इतरांमध्ये बाजारातील रंग वापरतात.

Rangpanchami 2024
Rangpanchami Festival : रंगपंचमीनिमित्त सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना

महिलांसाठी राखीव वेळ

रहाडीत रंग खेळण्यासाठी येणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असते. जुनी तांबट लेन येथील रहडीत रंग खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी दरवर्षी दोन तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्या वेळेत केवळ महिला रहाड रंगोत्सवाचा आनंद घेत असतात. इतर रहाडींजवळ महिलांसाठी रंग खेळण्यासाठी वेगळी व्यवस्था करून दिली जाते. रहाडीत एका वेळेस शंभर ते सव्वाशे व्यक्ती रंग खेळत असतात.

Rangpanchami 2024
Rangpanchami : निपाणीत रंगपंचमीसाठी बाजारपेठेत रंग

रहाडींची पूजा केली जाते

दर वर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. ४रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते.

या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून ती वर्षानुवर्षे तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक, तांबट अळी, जुनी तांबट आळी आणि मधली होळी अशा सहा रहाडी असून, यंदा सहाही रहाडी उघडण्यात आल्या आहेत.

Rangpanchami 2024
Rangpanchami Festival : रंगपंचमीनिमित्त सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com