Kitchen Hacks: 'अशी' करा सिलेंडर गॅसची बचत, बनवा या सोप्या उपायांनी गॅसवर जेवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kitchen Hacks: use less gas by these hacks

Kitchen Hacks: 'अशी' करा सिलेंडर गॅसची बचत, बनवा या सोप्या उपायांनी गॅसवर जेवण

चमचमीत जेवणाची ज्यांना सवय असते त्यांना जेवणात रोज चमचमीत पदार्थ हवे असतात. मात्र हे सगळे जेवणातील पदार्थ बनवत असताना स्वयंपाकघरातील तुमचा गॅस लवकर संपतो. मात्र हा गॅस तुम्ही काही सोपे उपाय करून वाचवू शकता. तुमच्या गॅसची बचत करण्यासाठी करा हे सोपे उपाय. (Kitchen Hacks: use less gas by these hacks)

महागाईच्या काळात गॅसचे दर उंचावले आहेत. त्यामुळे आता महिला गॅस जास्त काळ कसा पुरवता येईल याचा विचार करताना दिसताय. गॅसचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी कित्येकदा गृहिणी त्यांचे आवडते खाद्यपदार्थ कमीत कमी बनवत असतात. मात्र याव्यतिरिक्त अशे अनेक उपाय आहेत तुमच्या घरातील गॅस (Kitchen Hacks) वाचवता येऊ शकतो.

अशी करा गॅस बचत

नॉन स्टिक पॅनचा वापर करा

गॅसची बचत करण्यासाठी नॉन स्टिक पॅनचा वापर करा. जेव्हा तुमचा गॅस काही कारणास्तव कमी जळतो किंवा गॅस संपत येतो त्यावेळी तुम्ही आवर्जून नॉन स्टिक पॅनचा वापर करायला हवा. त्यामुळे गॅसची बचत होईल.

फ्रिजमधून काढलेल्या भाज्या लगेच फोडणी घालू नका

दूध, भाज्या यांसारख्या वस्तू फ्रिजमधून काढताबरोबर थेट गॅसवर ठेऊ नका. तुम्हाला जेवण बनवण्याची घाई नसेल तर या गोष्टी १-२ तास आधी रूम टेंम्प्रेचरमध्ये ठेवाव्या. त्यामुळे तुमचा गॅस कमी जळेल आणि गॅसची बचत होईल.

कोरड्या भांड्यांमध्ये जेवण बनवा

ओल्या भांड्यात जेवण बनवल्याने गॅस जास्त जळतो. त्यामुळे शक्यतो जेवण बनवण्यासाठी कोरड्या भांड्यांचा उपयोग करा.

प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवा

जेवन बनवताना प्रेशर कुकरचा वापर करा. डाळ,मांस आणि काही भाज्या उकळण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे अशा वेळी प्रेशर कुकरचा वापर फायदेकारी ठरतो.

Web Title: Read Easy Hacks To Cook In Less Gas Know Kitchen Hacks That Will Save Gas Cylinder

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..