सोमवारी ऑफिसला जाऊन काम करणं कठीण जातंय का? हे वाचा

शनिवार, रविवार अनेक कंपन्यांमध्ये सुट्टी असते.
workload stress
workload stressesakal

शनिवार, रविवार अनेक कंपन्यांमध्ये सुट्टी असते. त्यावेळी अनेकजण आराम करतात. पण सोमवारी ऑफिसमध्ये (Office) काम करणं अनेकांना जड जातं. डोकं दुखतं. प्रचंड ताण (Stress) येतो किंवा काम करण्याचाच कंटाळा येतो. अनेकजण अशा सोमवारी येणाऱ्या जडत्वामुळे वैतागलेले असतात. यामागे काही सामान्य कारणे असू शकतात.

workload stress
ऑफिसचे E-Mails घरी आल्यावरही चेक करताय! होईल मानसिक त्रास
work
worksakal

असू शकतात ही कारणं

एक म्हणजे नोकरीतून आनंद न मिळणे, तुम्‍हाला एखादे काम करणे आवडत नसेल पण, त्या कामासाठी तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला वीकेंडनंतर पुन्हा ते काम करण्यात अडचण येऊ शकते. या सोमवार ब्लूजमागील कारण शोधण्यास सुरुवात करा. तुमच्या दर, सोमवारी असलेल्या मीटिंगमुळे तुम्हाला त्रास होतो, की मोठ्या प्रमाणावर काम असल्याने ताण निर्माण होतो? एकदा तुम्हीच याचे उत्तर शोधल्यानंतर तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. कामात रस नसण्यामागचे आणखी एक कारण तुमचे आरोग्य असू शकते. म्हणून, तुमची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे, शरीरासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. तसेच झोपेची वेळ योग्य असणे गरजेचे आहे. तुम्ही आवडीचे काम करायला लागलात तर तुमचा सोमवार नक्की चांगला जाईल.

workload stress
दुपारी ऑफिसमध्ये येणारी झोप कशी टाळाल? जाणून घ्या सोप्या टिप्स
Work
Work Esakal

कामात लक्ष कसे लागेल?

याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अभिनव अग्रवाल यांनी टिप्स दिल्या आहेत.ते म्हणतात. सोमवारी कामावर येणारा कंटाळा घालविण्यासाठी कामावर प्रेम करणे हा सोपा मंत्र आहे. जरी तुमचे काम तुम्हाला आवडत नसेल तरीही त्याकडे मन एकाग्र करावे. कारण त्याशिवाय काही काळ तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. म्हणून मार्ग शोधण्यावर भर द्या.

तुम्हाला नक्की कशाचा त्रास होतोय,हा विचार करा. जर तुमच्यात एकाग्रतेचा अभाव असू शकतो. नावडते काम दिल्याने तुम्हाला अडचणी येत असलील. किंवा तुमचा बॉस तुमच्या मतांना महत्त्व देत नाहीत. एखाद्या कर्मचाऱ्याला असे वाटू लागते की त्याचे किंवा तिची ऑफिसात काहीच व्हॅल्यू नाही, अशावेळी त्या व्यक्तीची एकाग्रता पातळी लक्षणीयरीत्या खाली येते. शक्य असल्यास, याबद्दल आपल्या बॉसशी बोला. ते तुम्हाला नक्तीच योग्य मार्ग सांगू शकतील.

workload stress
गृहिणींमध्ये वाढतोय मानसिक तणाव, आनंदी राहण्यासाठी या 5 टिप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com