Reading Inspiration Day 2025: जगभरात १५ ऑक्टोबर हा दिवस मोठ्या उत्साहात "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. पण का? फक्त एक दिवस ठरवून वाचन करायचं असतं का? तर असं काही नाही. .भारतचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जी अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच १५ ऑक्टोबर. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने, विचारांनी आणि ज्ञानप्रेमाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांनी आयुष्यभर वाचनाला महत्व दिलं आणि वाचनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला. त्यांच्या स्मरणार्थ, वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून पाळला जातो..ICSI Recruitment 2025: CA-CS विद्यार्थ्यांसाठी करिअरची सुवर्णसंधी! ICSI मार्फत कॉर्पोरेट मंत्रालयात थेट भरती सुरू, जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया.महत्वज्ञान प्राप्तीचा मूलभूत मार्गवाचन ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. वाचनाच्या सवयीमुळे व्यक्तीमत्व विकास, भाषिक समृद्धी आणि विचारांची स्पष्टता येते.डॉ. कलाम यांचा आदर्शडॉ. ए. पी. जी अब्दुल कलाम हे स्वतः उत्तम वाचक होते. त्यांचे बालपण गरिबीत गेले, पण वाचनाच्या सवयीमुळे ते भारतचे सर्वोच्च शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती बनले..विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे‘वाचन प्रेरणा दिन’च्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये यामध्ये विविध वाचन उपक्रम राबवले जातात. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा या दिवसामागचा मुख्य उद्देश असतो.सांस्कृतिक व बौद्धिक समृद्धीवाचनामुळे आपली भाषा समृद्ध होते, विचारप्रक्रिया अधिक प्रगल्भ बनते. त्यामुळे समाजाचे एकूणच बौद्धिक स्तर उंचावते..Diwali Travel Pune: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचंय? मग पुण्यातल्या 'या' सुंदर ठिकाणी जा आणि परदेशासारखा अनुभव घ्या! .शाळांमध्ये उपक्रमडॉ. ए. पी. जी अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ सर्वच शाळांमध्ये वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, वाचन शपत असेल उपक्रम राबवले जातात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.