Mouth Ulcer: सतत तोंड येतं, खाण्याचे हाल? मग तातडीने करा हे घरगुती उपाय

तोंडात फोड येण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की औषधांचे दुष्परिणाम किंवा कोणताही आजार.
Mouth Ulcer
Mouth Ulcersakal

तोंडात फोड येणे ही एक छोटीशी समस्या आहे पण त्यामुळे खाणे पिणे कठीण होते. या समस्येने आपल्या सर्वांना कधी ना कधी त्रास दिला आहे. याची अनेक कारणे असू शकतात आणि ती कोणत्याही वयोगटातील व्यक्तींमध्ये होऊ शकते.

कधीकधी ते एवढे दुखते की ते सहन करणे कठीण होते. तोंडात फोड येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये झोपेचा अभाव, तणाव, पोषक तत्वांचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींचा समावेश होतो. जर तुम्हाला सतत तोंड येतं, असेल तर तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही तोंड आल्यावर घरगुती उपायाची मदत घेऊ शकता.

तोंड येण्याचे कारण

  • तोंडात फोड येण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोट साफ न होणे.

  • ज्या लोकांचे पोट नीट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेची समस्या कायम असते, त्यांना या समस्येला सामोरे जावे लागते.

  • पोटात उष्णता वाढली तरी तोंडात फोड येतात.

  • शरीरात पोषणाचा अभाव हे देखील तोंडात फोड येण्याचे कारण आहे.

  • अनेकदा झोप पूर्ण झाली नाही तरी ही समस्या उद्भवू शकते.

  • दीर्घकाळ ताणतणाव हे देखील एक कारण आहे.

  • शरीरात पाण्याची कमतरता हे देखील याचे कारण आहे.

Mouth Ulcer
Black Turmeric: पिवळ्या हळदीपेक्षा काळी हळद आरोग्यासाठी जास्त फायदेशीर... अशा प्रकारे करा वापर

अनेक वेळा तोंडातील फोड 1-2 दिवसात स्वतःच बरे होतात. अल्सरपासून मुक्त होण्यासाठी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, याद्वारे फोड लवकर बरे होऊ शकतात. कच्चे आणि थंड दूध तोंडात 2-3 मिनिटे ठेवून ते संपूर्ण तोंडात फिरवावे. हे 3-4 वेळा करा. थंड दूध उष्णता मारून टाकते आणि त्यामुळेच फोडाला आराम मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com