
नागपूर : कुठल्याही नात्यामध्ये विश्वास, संवाद आणि प्रेम असणे गरजेचे आहे. मात्र, काही जोडप्यांमध्ये संवादाची कमतरता जाणवते. याचमुळे कधीकधी नातं हे तुटण्यापर्यंत येतंय. अगदी टोकाचे निर्णय घेतले जातात. यामध्ये तुमच्या जोडीदाराचा इगोही आड येतो. 'तो आधी बोलत नाही. मग मीच का बोलू' ही भावना ज्यावेळी मनात येते त्यावेळी खटके उडायला लागतात. आपला जोडीदार दुसऱ्या महिलेसोबत बोलत असावा, असा विचार अनेकजण करतात. असं तुमच्यासोबतही होत असेल तर घाबरू नका. या जगात १० पैकी ९ जणांची हीच समस्या आहे. पण, असं का घडतं? याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
आजकाल चॅटींग करून आपल्या भावना व्यक्त करणे सोपे झाले आहे. मात्र, काही जणांना चॅटींगद्वारे आपल्या नात्याला पुढे नेणे आवडत नाही. त्यापेक्षा फोनवर संवाद साधणे जास्त आवडते. त्यांच्या स्वभावामुळे कदाचित हे होत असावे. इतकेच नाहीतर महिलांपेक्षा पुरुषांना समजणे खूप सोपे असते. अनेकदा ते तुम्हाला टाळत नसतात, तर त्यामागील काही कारण वेगळे असते.
लाजाळूपणा -
तुमचा होणारा जोडीदार किंवा बॉयफ्रेंड तुम्हाला लवकर उत्तर देत नसेल तर तुमच्यामध्ये जवळीक नाही, असा अर्थ मुळीच काढू नका. हे त्याच्या लाजाळूपणामुळे देखील होऊ शकते. अनेकजण त्यांच्या मित्रांजवळपण बोलू शकत नाहीत. त्यांच्या स्वभावामुळे हे घडत असते. त्यामुळे तुम्ही त्याला समजून घ्या.
भावनांना ठेच पोहोचण्याची भीती -
तुमच्या बॉयफ्रेंडला पूर्वीच्या नात्यामध्ये ब्रेकअपचा सामना करावा लागला असेल. त्यामुळे या नात्यामध्ये समजून घ्यायला त्याला काही वेळ हवा असेल. त्यामुळे तुम्ही त्याला एकटे सोडणे गरजेचे आहे. तसेच नातं पुढे नेण्यात तो इतका वेळ का घेतो? हे देखील तुम्ही समजून घ्यायला पाहिजे.
व्यग्र जीवन -
पुरुष हे महिलांसारखे मल्टीटास्कींग नसतात यात काहीच शंका नाही. घर आणि बाहरेच्या कामामध्ये ताळमेळ नसतो. महिला या घर, ऑफीस आणि वैयक्तीक जीवनही अगदी सहजपणे हाताळतात. जर तुमचा जोडीदार तुम्हाला चॅटींग करताना जास्त वेळ देत नसेल सर्वात आधी त्याचे लाईफस्टाईल समजून घ्या. तो इतका का व्यग्र राहतो? यामागचे कारण समजून घ्या.
मनमोकळेपणाने बोलणं नाही -
अनेकजण फोनवर मनमोकळेपणाने बोलू शकतात तितके चॅटींगमध्ये बोलत नाहीत. ही व्यक्ती तासन् तास फोनवर बोलू शकते. मात्र, चॅटींग करण्याचा त्यांना कंटाळा येतो. तुमच्या जोडीदाराचाही स्वभाव असाच असेल तर त्यासोबत या विषयावर चर्चा करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की सापडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.