Woman Needs : स्त्रिला पुरुषाकडून नेमकं काय हवं असतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Needs

Woman Needs : स्त्रिला पुरुषाकडून नेमकं काय हवं असतं?

Woman Needs स्त्रियांच्या मनात सुरू असलेली घालमेल कुणीच समजू शकत नाही. असं म्हणतात की महिलांच्या मनात सतत विचार सुरू असतात त्यामुळे तिच्या मनाला जाणून घेणे, खूप कठीण काम आहे.

घरदार, ऑफीस, नवरा, मुलं, सासू सासरे, नातेवाईक आणि या पलीकडे तिच्या इच्छा, हे सर्व मॅनेज करणे एका स्त्रिसाठी खूप आव्हानात्मक असतं. मुळात आपल्या भारतीय संस्कृतीत आधीपासूनच महिलांना नेहमी स्वत: पेक्षा इतरांचा फार विचार करणारी प्रतिमा दाखवली आहे.

अशात स्त्रियांना काय हवं असतं, हा प्रश्नावर कधीच चर्चा होत नाही. पण आज स्त्रियांना नेमकं काय हवं असतं या विषयी जाणून घेणार आहोत. (relationship basic needs of a woman want from man read story)

स्त्रियांना नेमकं काय हवं असतं?

  • एक स्री ही नेहमी प्रेमाच्या शोधात असते. कुठल्याही स्त्रीला प्रेम हवे असतं. जिथं प्रेम तिथे ती विसावते. हे प्रेम काळजी आणि आपुलकीतून दिसून येते.

  • याशिवाय स्त्रियांना प्रेम व्यक्त करायलाही आवडते. कधी मुलांवर तर कधी आईवडीलांवर तर कधी नवऱ्यावर किंवा कुटूंबावर.

  • माहेरी जसं प्रेम, काळजी केली जायची तसचं प्रेम आपल्याला आयुष्यभर मिळत राहो, अशी मापक इच्छाही तिची असते.

हेही वाचा: Girls Fashion : मुली कोणासाठी नटतात?

  • दोन वेळ चटणी भाकर खाऊन झोपडीत राहणे तिला आवडेल पण संशयी नवरा तिला कधीच आवडत नाही.

  • सुखदुःखात साथ देणारा, समजून घेणारा नवरा तिला हवा असतो. निरागस आणि प्रेम करणारी मुलं तिला हवी असतात. याशिवाय आई वडीलांची माया देणारे सासू सासरे असावेत, असंही तिला वाटत असतं.

  • तर याशिवाय प्रत्येक स्त्रिचं स्वत:चं, हक्काचं एक घर असावं, अशी मापक इच्छा असते.

  • स्त्रियांना चारचौघीत मिरवण्यात खूप हौस असते. त्यामुळे कित्येकदा कितीही दु:खात असली तरी ती तिचं दु:ख कधीच कुणाशी शेअर करत नाही. याशिवाय उलट माझं सर्व उत्तम आहे, अशीच ती बोलत असते.