करिअर आणि रिलेशनशीपचा समतोल राखण्यासाठी फॉलो करा 'या' टीप्स

अशा पद्धतीने राखता येईल करिअर आणि रिलेशनशीपचा समतोल
Career
Careere sakal
Updated on

आपल्यापैकी असे बरेचसे लोक असतात जे करिअरच्या बाबतीत जरा जास्तच सिरीअस असतात. अनेकदा या करिअर ओरिएंडट लोकांचा कामामुळे कुटुंबाकडे किंवा जोडीदाराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे सहाजिकच या कारणामुळे घरात वादविवाद होऊ लागतात. परंतु, जॉब, करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकच आपलं कुटुंबदेखील गरजेचं आहे. त्यामुळे धकाधकीच्या या जीवनात दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, करिअर आणि रिलेशनशीप या दोघांमधील समतोल कसा राखावा ते पाहुयात. (relationship tips how to balance your career and love life at the same time)

१. लहान लहान गोष्टींमधून एकमेकांना वेळ द्या -

एकमेकांना वेळ देण्यासाठी मोठ्या सुट्टीचीच आवश्यकता असते असं काही नाही. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी अगदी अर्धा-एक तासदेखील पुरेसा होतो. त्यामुळे जर तुम्ही दोघंही वर्किंग पर्सन असाल तर लंच ब्रेकमध्ये एकमेकांना भेटून सोबत जेवायला जाऊ शकता. तसंच ऑफिस सुटल्यावर एखादा चित्रपटही पाहू शकता. ऑफिस सुटल्यावर चित्रपट पाहणं शक्य नसेल तर विकेंडच्या दिवशी घरीच एकत्र आवडीचा चित्रपट पाहा. लहान लहान कामात एकमेकांची मदत करा ज्यामुळे पार्टनरवरील कामाचा ताण कमी होईल व तो तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देऊ शकेल.

२. अटी लादू नका -

कोणत्याही नात्यात अटी ठेऊ नका. अटींशिवाय पार्टनरला करिअरमध्ये आणि घरातील जबाबदाऱ्यांमध्ये मदत करा. यामुळे तुमच्यातील बाँडींग अजून चांगलं होईल.

Career
नागपंचमी: जाणून घ्या, नागाला दूध न पाजण्याचं वैज्ञानिक कारण

३. अपेक्षा ठेऊ नका -

अनेकदा रिलेशनशीपमध्ये पार्टनरच्या एकमेकांकडून काही अपेक्षा असतात. मात्र, या अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत असा अट्टाहास करु नका. कामाचा ताण, जबाबदारीचं ओझं यामुळे अनेकदा मानसिक व शारीरिक ताण येत असतो. त्यामुळे अशावेळी पार्टनरकडून कोणत्याही अमूक-तमूक प्रकारच्या अपेक्षा ठेऊ नका. अनेकदा घरातील सगळं काम स्त्रियांनीच पूर्ण करावं अशी सर्वसामान्यपणे कुटुंबियांची अपेक्षा असते. मात्र, स्त्रियांवरील कामाचा भार वाढला तर त्यात तुम्ही तिची नक्कीच मदत करु शकता.

४. निर्णय घेताना पार्टनरचा सल्ला घ्या -

बऱ्याचदा काही जण पार्टनरला कल्पना न देता एखादा निर्णय घेतात. मात्र, यामुळे पार्टनर दुखावला जाऊ शकतो. ज्यामुळे मतभेद निर्माण होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणूनच, कोणताही निर्णय घेताना पार्टनरचा सल्ला नक्की घ्या.

५. परिस्थितीनुसार बदला -

ऑफिसचं आणि घरचं वातावरण पूर्णपणे वेगळं असतं. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनेच वागा. ऑफिसप्रमाणे घरात वागू नका. तसंच घराप्रमाणेच ऑफिसमध्येही स्वच्छंदीपणे वागू नका. त्यामुळे परिस्थितीनुसार कसं बदलावं याचं कौशल्य जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com