Relationship Tips: लग्नाच्या अनेक वर्षानंतरही प्रेमात सातत्य हवंय, तर मग 'या' गोष्टी करायलाच हव्यात

Relationship Tips: पती-पत्नीमधील नातं प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. पण आयुष्यभर घर, संसार, नवरा, मुलांची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या नात्यात दुरावा येतो.
Relationship Tips:
Relationship Tips:Sakal

relationship tips how to build strong bond love husband wife after years

पती-पत्नीमधील नातं प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. पण आयुष्यभर घर, संसार, नवरा, मुलांची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या नात्यात दुरावा येतो. जेव्हा दोघांपैकी एक या बदलांशी जुळवून घेत नाही तेव्हा नात्यात दुरावा येऊ शकतो. जर तुम्हाला वैवाहिक आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

  • सवयी बदला

नात्यातील प्रेम आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी पती-पत्नीने आपल्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. जसे की, जर तुम्ही आधी एकत्र जेवण करत होता, पण आता करत नसाल तर असे करू नका. जोडीदाराला तुम्ही खास असल्याचा अनुभव द्या. यामुळे नात्यात प्रेम वाढेल.

  • आरोग्याची काळजी घेणे

एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास नात्यातील आपुलकी वाढते. जोडीदार आजारी असल्यास औषधं द्यावी. जोडीदाराला एखादा आजार असल्यास त्याच्या औषधांच्या वेळा आणि तपासणीकडे लक्ष द्यावे.

  • तणाव दूर करणे

वाढत्या वयाबरोबर मानसिक तणाव वाढू शकतो. यामुळे दोघांनी त्या विषयांवर चर्चा करून उपाय काढावे. सकाळ-संध्याकाळ चालायला जावे. ऑफिसमधील ताण किंवा काम घरी आणू नका. सकारात्मक आणि मजेदार गोष्टींवर चर्चा केल्याने तणाव कमी होऊ शकतो.

  • तुलना करू नका

आपल्या जाडीदाराची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही असे करत असाल तर नात्यात कटूता वाढू शकते.

  • एकमेकांना वेळ द्या

नात्यात प्रेम आणि आपुलकी वाढण्यासाठी एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. तुम्ही दोघेही नोकरी करत असाल तर घरी आल्यावर सोबत जेवण करतांना किंवा चहा पिताना एकमेकांशी गोष्टी शेअर करा.

Relationship Tips:
Morning Tips: केसांमधील गुंता कमी होण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
  • मानसिक त्रास देऊ नका

पती-पत्नीमध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण अशा परिस्थितीत लक्षात ठेवा की जोडीदाराचे मनं दुखेल अशी गोष्टी बोलू नका. कारण यामुळे वाद वाढू शकतो आणि नात्यात कटूता येऊन नातं तुटू शकते.

  • आदर करावा

कुंटूबात जोडीदाराबद्दल वाईट बोलू नका. कारण तुम्ही जोडीदाराचा आदर केला नाही तर घरातील इतर सदस्य देखील आदर करणार नाही.

  • भेटवस्तू द्या

जोडीदाराला खास प्रसंगी भेटवस्तू द्याव्या. यामुळे तुम्ही त्याच्यासाठी खुप खास आहात हे समजेल. तसेच जोडीदारासाठी सरप्राईज डिनर प्लॅन करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com