
Relationship Tips : बॉयफ्रेंडशी लग्न करण्याचा विचार करताय? मग हे वाचाच नाहीतर आयुष्य...
Relationship Tips : कुठल्याही नात्यात स्वभाव हा खूप महत्वाचा होता. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तुमच्या पार्टनरचा स्वभाव तुम्ही नीट ओळखून आहात याची खात्री पटल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घ्या. नाहीत तुम्हाला आयुष्यभर मनस्ताप सहन करावा लागेल. आज आपण पार्टनरच्या स्वभावातील या सहा गोष्टींबाबत जाणून घेऊयात. जेणेकरुन नंतर तुम्हाला नात्यात त्रास सहन करावा लागणार नाही.
जर तुम्ही लग्नाआधी रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असाल तर अनेक वेळा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी लग्न करण्याचा विचार केला असेल. पण एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टी बारकाइने तपासल्या पाहिजेत, असे रिलेशनशिप एक्सपर्ट्स स्पष्ट सांगतात. तेव्हा जोडीदाराबाबतचा रेड आणि ग्रीन अलर्ट काय असतो ते जाणून घ्या.

रेड सिग्नल म्हणजे जोडीदाराच्या त्या सवयी आहेत, ज्यामुळे तुम्ही दुःखी किंवा अस्वस्थ होतात. तुम्हाला त्यांच्यावर संशय घेण्यास भाग पाडणाऱ्या या गोष्टी आहेत. त्याच वेळी, ग्रीन सिग्नल म्हणजे तुमच्या नातेसंबंधांना एका वेगळ्या स्तरावर घेऊन जातात. तर आधी आपण नात्यातील ग्रीन सिग्नल्स कोणते ते जाणून घेऊया.
१) वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी, व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्या प्रियकराला तुमच्यावर किंवा या नात्यावर विश्वास नसेल, तर याचा अर्थ तो तुमच्यासोबत भविष्य बघू इच्छित नाही.
लग्नासाठी नेहमी अशी व्यक्ती निवडा जी तुमच्यावर फक्त प्रेमच करत नाही तर त्याला तुमचे आयुष्य तुमच्यासोबत घालवायचे आहे हे देखील माहित आहे.
२) तुमच्या व्हिजनला सपोर्ट करणारा पार्टनर
तुमच्या व्हिजनने तुमचं स्वप्न बघू इच्छिणारा जीवनसाथी निश्चितच भाग्याने मिळतो. म्हणूनच, त्याच्यासोबत भविष्याची स्वप्ने पाहण्याआधी आपल्या प्रियकरामध्ये ही गुणवत्ता पाहणे महत्वाचे आहे.
जर तुमचा प्रियकर तुमच्या निर्णयांना महत्त्व देत नसेल किंवा तुमच्या इच्छांना निरर्थक म्हणत असेल, तर तो तुमचा जीवनसाथी होण्यास योग्य नाही.
३) सगळ्याच विषयांवर उघडपणे बोलणारा
कम्यूनिकेशन ही आनंदी नात्याची गुरुकिल्ली मानली जाते. जिथे दोन लोक एकमेकांचे ऐकायला तयार असतात त्यामुळे संघर्षाची शक्यता कमी असते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही आणि तुमचा प्रियकर प्रेमाबद्दल खुलेपणाने बोलत असाल, गंभीर आणि विचित्र विषयांवर मजा-मस्करी केली तर तुमच्या नातं हे नक्कीच ग्रीन सिग्नलमध्ये येतं.
अशा स्वभावाचे पार्टनर असल्यास...
१) लगेच इन्फ्युएन्स होणारे
अशा लोकांवर विश्वास ठेवणे कठीण आहे जे चटकन एखाद्याच्या प्रभावाखाली येतात. म्हणूनच बॉयफ्रेंडमध्ये आपल्या भावी पतीला शोधण्यापूर्वी नेहमी त्याचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे तपासा.
आपल्या चुका मान्य करणे हे शौर्याचे कार्य आहे. जे आपल्या चुका मान्य करत नाहीत, ते सर्व चुकांसाठी इतरांना दोष देतात. मग अशा व्यक्तीसोबत आयुष्यभर आनंदाने जगता येईल का? याचा स्वत:च एकदा विचार करा. (Relationship Tips)
जर तुमचा जोडीदार त्याच्या बिझी शेड्युलमधून तुमच्यासाठी वेळ काढत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात. जे चांगल्या जोडीदाराचेही लक्षण आहे.
या सगळ्या स्वभावगुणांचा अगदी व्यवस्थित अभ्यास करुन तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडचा फ्युचर हसबंड म्हणून विचार करु शकता.