ऑफिसमध्ये एक्स पार्टनर कलिग म्हणून आला तर?

एक्स पार्टनरला पाहिल्यानंतर मनात प्रश्नाचं मोठं काहूर माजतं, पण...
workplace
workplace
Updated on

सध्याच्या काळात ब्रेकअप, पॅचअप या गोष्टी तरुणाईसाठी नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र, तरीदेखील ब्रेकअपचं दु:ख पचवणं अनेकांना जमत नाही. अनेक जण ब्रेकअप झाल्यानंतर पूर्णपणे कोलमडून जातात. तरीदेखील दु:ख सारून ते नव्याने आयुष्याची सुरुवात करतात. विशेष म्हणजे या व्यक्ती इतरांसमोर सारं काही नॉर्मल सुरु आहे असं दाखवतात. मात्र, त्यांच्या मनात बरीच उलथापालथ सुरु असते. त्यातच जर अचानकपणे एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड समोर आले तर मग त्यावेळी व्यक्तीच्या मनाची नेमकी काय स्थिती होते हे सांगणं तसं कठीणच आहे. म्हणूनच, जर तुमचा एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुमच्याच ऑफिसमध्ये कलिग म्हणून आले तर ही परिस्थिती नेमकी कशी हाताळावी ते पाहुयात. (relationship when you meet your ex partner at your workplace then manage with these tricks)

१. एक्स पार्टनरपासून दूर रहा -

एक काळ असतो ज्यावेळी तुम्ही पार्टनरच्या प्रत्येक पावलासोबत चालत असता. मात्र, ब्रेकअप झाल्यानंतर परिस्थिती बदलेली असते. त्यामुळे ब्रेकअपनंतर ही व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली तर तिच्यापासून दूर रहाणंच फायद्याचं ठरेल. ऑफिसमध्ये तुम्ही कामानिमित्त एकत्र आहात. त्यामुळे केवळ कामापूरतंच बोलावं. तसंच सध्याच्या घडीला तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे हे सुद्धा चुकूनही एक्सला सांगू नये.

workplace
विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक!

२. ब्रेकअपविषयी अन्य कलिग्सला सांगू नका -

एक्स पार्टनर कलिग म्हणून ऑफिसमध्ये रुजू झाल्यानंतर त्याच्याविषयी इतर कलिग्ससोबत चर्चा करु नका. त्यामुळे तुमच्या नात्याविषयी ऑफिसमध्ये पुन्हा चर्चा होऊ शकते. तसंच यातूनच मग वेगवेगळे गॉसिप्स होऊ शकतात. तसंच काम करताना एक्स पार्टनरने तुम्हाला साथ दिली किंवा तुमच्या कामातील चूक काढली तर हे सारं काही मुद्दाम सुरु आहे असाही समज इतर कलिग्सचा होऊ शकतो.

३. एक्ससमोर नॉर्मल रहा -

बऱ्याचदा एक्स पार्टनर समोर आल्यानंतर गडबडून जायला होतं. त्यांच्याही नेमकं काय बोलावं हा प्रश्न उभा राहतो. किंवा, मनावर एक प्रकारचं दडपण येतं. म्हणूनच, मनात कितीही कोलाहल माजला असला तरीदेखील एक्स समोर सारं काही नॉर्मल सुरु आहे असाच आविर्भाव चेहऱ्यावर ठेवा. त्यांच्या पुन्हा येण्याने तुम्हाला काहीही फरक पडला नाहीये हे त्यांना दाखवून द्या.

४. ऑफिसच्या कामात मित्रांची मदत घ्या -

जर एकाच प्रोजेक्टसाठी तुमची व एक्स पार्टनरची निवड केली, तर अन्य कलिग्सची मदत घेऊन एक्सोबत काम करणं कसं शक्य नाही हे सांगायचा प्रयत्न करा. परंतु, यावेळी तुमचा भूतकाळ उघड होणार नाही याची काळजी घ्या. अशा परिस्थितीत एक्ससोबत काम करण्यापेक्षा इतर कलिग्ससोबत ते काम कसं चांगल्याप्रकारे होईल हे सिनिअर्सला पटवून द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com