

What is the ideal age gap between partners for a stable and long-lasting relationship
sakal
Ideal Age Gap Between Partners: प्रेम आंधळं असतं हे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. प्रेमात पडल्यावर वय, दिसणं, शरीरयष्ठी किंवा इतर कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न मात्र नक्की असतो, तो म्हणजे नात्यात वयाचा खरंच काही फरक करतो का?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात हजारो जोडप्यांचा अनेक वर्षांचा डेटा तपासला गेला होता. या अभ्यासातून असं दिसून आलं की, प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं, पण नातं किती स्थिर, समाधानी आणि टिकाऊ राहील, यावर वयाचा फरक खरोखरच परिणाम करू शकतो. कसा ते जाणून घेऊया.