Remedies for Earwax : ओढून ताणून कानातला मळ बाहेर येणार नाही, हे सोपे उपाय करा फरक पडेल!

एकाच झटक्यात सर्व कानातले बाहेर काढतील
Remedies for Earwax
Remedies for Earwaxesakal

Remedies for Earwax : हवेतील प्रदूषण, धूळ, माती, इत्यादींमुळे कानात मळ साचत असतो. काही दिवस तो साफ केला नाही तर कान जड होणे, कानाला खाज येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. कानात मळ साचल्यावर बरेचजण त्याला साफ करण्यासाठी माचीसच्या काड्या, सेफ्टी पिन, गाडीची चावी, इअरबड्स अशा गोष्टी वापरतात, परंतु असे करणे अत्यंत धोकादायक असते.

स्वच्छतेची कितीही काळजी घेतली तरी कान हे शरीराचे असे भाग आहेत, जिथे घाण साचते. आंघोळ केल्याने कानाची बाहेरची घाण साफ होते, पण कानाच्या आतील घाण साफ होत नाही आणि हळू हळू आत जात राहते. वैद्यकीय भाषेत याला इअरवॅक्स असेही म्हणतात. (Remedies for Earwax : how to remove ear wax blockage)

कानात घाण साचून मळ तयार होतो. मळ हा बाहेरून गेलेल्या धुळ, माती यामुळेच जमतो पण तो मेणासारखा घट्ट होतो. हा मळ कानाच्या पडद्यांना आणि पॅसेजला चिकटतो. यामुळे तुम्हाला ऐकण्याची समस्या, कानात संसर्ग, खाज सुटणे, पू होणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Ear Care)

Remedies for Earwax
Earrings Designs : मुलींनो, पहा इअररिंग्सच्या 'या' हटके डिझाईन्स

कान स्वच्छ करण्यासाठी तेल गरम केल्यानंतर कानात घालणारे किंवा कानात कोणतीही तीक्ष्ण वस्तू टाकून घाण काढण्याचा प्रयत्न करणारे अनेक जण आहेत. असे करणे चुकीचे आहे कारण यामुळे कानात संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

लक्षात ठेवा कानाचा पडदा अतिशय संवेदनशील असतो आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केल्याने तुम्ही बहिरे होऊ शकता.

कानात मळ साठल्याची लक्षणे कोणती

  1. कानाला खाज येणे

  2. कान दुखणे

  3. कानाची श्रवणशक्ती कमी होणे.

  4. कानात विविध प्रकारचे आवाज येणे.

बेबी ऑईल

MayoClinic.com नुसार, तुमच्या कानात बेबी ऑइल, खनिज तेल, ग्लिसरीन किंवा हायड्रोजन पेरॉक्साइडचे काही थेंब टाकण्यासाठी आयड्रॉपर वापरा. एक-दोन दिवसांनंतर, जेव्हा मेण मऊ होईल, तेव्हा रबर-बल्ब सिरिंज वापरून हळूहळू कानात कोमट पाणी घाला.

आपले डोके वाकवा आणि आपले बाह्य कान वर आणि मागे खेचा. डोके एका बाजूला टेकवा जेणेकरून पाणी बाहेर पडेल. कानाचा बाहेरील भाग टॉवेलने पुसून घ्या. (Earwax Cleaning Tips)

Remedies for Earwax
Bikini Area Waxing : बिकिनीच्या भागातले केस कसे काढाल ?

बेकिंग सोडा

1/2 चमचे बेकिंग सोडा 2 चमचे कोमट पाण्यात विरघळवा. जर तुमच्याकडे ड्रॉपरची बाटली असेल तर त्यात द्रावण घाला.तुमचे डोके एका बाजूला वाकवा आणि हळूहळू द्रावणाचे 5 ते 10 थेंब तुमच्या कानात टाका. द्रावण 1 तास कानात राहू द्या, नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. कानातले साफ होईपर्यंत दिवसातून एकदा हे करा. हे एक-दोन दिवस करा.

लसूण तेल

ज्या लोकांना इअरवॅक्स जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे वेदना होत असतील त्यांनी लसूण तेलाचा वापर करावा. लसणात आढळणारे एलिसिन हे संयुग बॅक्टेरियाशी लढण्यास आणि कानाच्या संसर्गावर उपचार करण्यास मदत करू शकते. लसूण तेलाचा वापर कोणत्याही प्रकारच्या कानाच्या संसर्गासाठी केला जाऊ शकतो. (Humen Body)

Remedies for Earwax
Ear Care Tips : कानांना सुरक्षित ठेवायचं असेल तर आत्ताच ही घाणेरडी सवय बदला!

मिठाचं पाणी

इअरवॅक्स काढण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. डॉक्टर सहसा याची शिफारस करतात. 9 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळवून 9% द्रावण तयार करा आणि या पाण्याचे काही थेंब तुमच्या कानात टाका. तुम्ही हे सोल्युशन जवळच्या फार्मासिस्ट स्टोअरमधून देखील खरेदी करू शकता.

इअरवॅक्स ड्रॉप

कानातील मळ काढण्यासाठी त्याला आधी मऊ करणे गरजेचे असते. तेव्हा हा इअरवॅक्स काढण्यासाठी मेडिकलमध्ये अनेक ड्रॉप्स मिळतात. तेव्हा कानातील मळ काढण्यासाठी असे काही ड्रॉप्स तुम्ही ५ ते ७ दिवस करू शकता. कानात साचलेली घाण साफ होईल. (Drops)

हायड्रोजन पेरॉक्साइड

मित्रांनो आपण कमी प्रमाणामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड पाण्यामध्ये मिसळून थोड्या प्रमाणामध्ये आपल्या कानामध्ये टाकावे काही वेळाने हे पाणी काना बाहेर काढण्यासाठी कान एका बाजूला करा.

Remedies for Earwax
Rash After Waxing : व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर रॅश येते? घ्या ही काळजी

मोहरीचे तेल

मित्रांनो, कानामध्ये आपल्या जर मळ असेल तर अशावेळी मोहरीचे तेल अतिशय उत्तम मानले जाते. तेल आपण थोडेसे गरम केल्यानंतर कानामध्ये दोन ते तीन थेंब टाकायचे असतात असे केल्याने तुमच्या कानामध्ये जमा झालेला मळ हा हळूहळू नरम होत असतो आणि तो बाहेर निघून जात असतो.

कांद्याचा रस

मित्रांनो, कांदा हा वाफेवर शिजवून त्याचा रस काढल्यानंतर या कांद्याच्या रसाचे काही थेंब ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कानामध्ये टाकावे याने कानामधील असणारा मळ निघून जाण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com