Report : कमी उंचीचे पुरुष असतात चांगले जोडीदार, त्यांचे Sex life... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Report

Report : कमी उंचीचे पुरुष असतात चांगले जोडीदार, त्यांचे Sex life...

नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित अनेक मनोरंजक माहिती समोर आली आहे. या अभ्यासात असं आढळून आलंय की, उंच पुरूषांपेक्षा कमी उंची असलेले पुरुष अधिक सेक्‍शुअली एक्टिव असतात. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी ५३१ पुरुषांवर केलेला हा अभ्यास केला आहे. स्त्रियांना उंचीने कमी असलेले पुरुष आवडत नाहीत, असे नाही. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपी आहेत जिथे पुरुष लहान आणि स्त्रिया उंच असतात.

अभ्यासात काय आहे?

अभ्यासात असं आढळून आलं की, ज्या पुरुषांची उंची १७५ सेमीपेक्षा कमी होती, म्हणजेच ज्यांची उंची ५ फूट ९ इंचपेक्षा कमी होती, त्यांची सेक्स ड्राइव्ह चांगली होती. कमी उंचीचे पुरुष सेक्‍शुअली एक्टिव असतात, शिवाय त्यांची घटस्फोट घेण्याची शक्यता ३२ टक्के कमी असते.

असतात चांगले जोडीदार

संशोधकांचं म्हणणं आहे की, कमी उंची असलेले पुरुष जास्त घरगुती कामं करतात आणि उंच पुरुषांपेक्षा जास्त पैसे कमावतात. एकूणच, या अभ्यासानुसार, पुरुषाची उंची जितकी कमी असेल तितका तो चांगला जोडीदार असल्याचं सिद्ध होतं.

संशोधकांना असं वाटतं की, उंच पुरुष त्यांच्या दिसण्याबद्दल अधिक विश्वास ठेवतात आणि घरातील कामांना ते योग्य मानत नाहीत. दुसरीकडे, कमी उंची असलेले पुरुष स्वतःला सिद्ध करण्यात गुंतलेले असतात आणि यामुळेच ते घरी आणि ऑफिसमध्ये कठोर परिश्रम करतात.

टॅग्स :lifestyle