Republic Day 2023 : घरी राहून कसा खास बनवाल प्रजासत्ताक दिन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic Day 2023

Republic Day 2023 : घरी राहून कसा खास बनवाल प्रजासत्ताक दिन?

भारताचा राष्ट्रीय सण म्हणजे देशाचा स्वातंत्र्यदिन   आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. दोनच दिवसावर भारताचा प्रजासत्ताक दिन आला आहे. भारतासाठी हा दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. त्यामुळे सर्वच नागरिक यादिवशी वेगवेगळ्या गोष्टी करून आनंद व्यक्त करत असतात.

हेही वाचा: Republic Day 2023 : 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणात नेमका काय फरक आहे?

प्रजासत्ताक दिनादिवशी सुट्टी असते. त्यामुळे अनेक लोक ट्रिप प्लॅन करतात.तर काहीलोक घरीच राहुन आराम करतात. पण, तूम्हाला या दिवशी काही खास गोष्टी करून देशप्रेम व्यक्त करू शकता. त्यासाठी खूप कष्ट घेण्याचीही गरज नसते. काही सोप्या गोष्टी करून तूम्ही प्रजासत्ताक दिन संस्मरणीय कसा करू शकता हे पाहुयात. (Republic Day 2023 : Republic day celebration at hone tips)

हेही वाचा: Republic Day Parade : सलामीसाठी गरजणार स्वदेशी इंडियन फील्ड गन; 'ही' आहेत वैशिष्ट्ये

तिरंगा लुक

विधानसभेपासून ते खासगी आणि सरकारी कार्यालये, मॉल-पार्क, पेट्रोलपंप सगळे देशभक्तीच्या रंगात सजले जातात. 26 जानेवारीला तूम्ही तिरंगा रंगातील पारंपारिक लूक करू शकता.  मुले कुर्ता, अफगाणी घालू शकतात. मुली सूट, ट्रेंडी लाँग स्कर्ट, काही इंडो वेस्टर्न घालू शकतात.

हेही वाचा: Republic Day 2023 : ‘याची देही याची डोळा’ पहायचाय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा?; असे बुक करा तिकीट!

तिरंगा रेसिपीज

एखाद्या खास प्रसंगी खास पदार्थ बनवले जातात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनालाही तूम्ही खास गोड पदार्थ बवनू शकता. तेही तिरंगा रंगात असलेले. यात तूम्ही तिरंगा रंगातील ढोकळा, शिरा, सॅलेड, तीन रंगातील गाजराचा हलवा यांचा समावेश करू शकता.तुम्ही वेगवेगळ्या रंगातील फळांचे ज्यूस एकत्र करून त्याला तिरंगा रंग देऊ शकता.

हेही वाचा: Republic Day 2023 : यंदा राजपथावर महिला अधिकाऱ्यांची मोटारसायकल सवारी

चित्रपट पहा

जर तुम्ही घराबाहेर जाऊ शकत नसाल, तर तुम्हाला घरच्या मनोरंजनासाठी काहीतरी खास करावे लागेल. प्रजासत्ताकदिनी तुम्ही काही खास चित्रपट पाहू शकता. देशभक्तीवर अनेक चित्रपट बनले आहेत. एअरलिफ्ट, 1973, एलओसी, राझी, यूआरआय पाहू शकता. भुजः द प्राईड ऑफ इंडिया, शेरशाह आणि अटॅक हेही पाहु शकता.

टॅग्स :Republic DayCelebration