PM Modi special photo on 77th Republic Day
Sakal
लाइफस्टाइल
Republic Day 2026: संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा फोटो! 77व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा खास लूक चर्चेत
PM Modi special photo on 77th Republic Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी त्यांच्या पोशाखामुळे चर्चेत असतात. पंतप्रधान मोदींच्या पोशाखात भारतीय संस्कृतीची झलक स्पष्टपणे दिसून येते.
Significance of Narendra Modi Republic Day photo: आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आहे. आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा करण्यात येत आहे. हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी 1950 मध्ये भारताला संविधान मिळाले, त्यानंतर भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत तिरंगा फडकवून परेडचे उद्घाटन केले. यावेळी कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. नेहमीप्रमाणे यावेळीही पीएम मोदी अगदी हटके अंदाजात दिसले. आज पुन्हा एकदा त्यांच्या पगडीने नागरुकांचे लक्ष वेधून घेतले. चला तुम्हाला त्याचा पूर्ण लुक कसा होता.

