Research on Aging : स्त्रियांपेक्षा खरंच लवकर वयस्कर दिसतात पुरुष? संशोधन सांगतं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Research on Aging

Research on Aging : स्त्रियांपेक्षा खरंच लवकर वयस्कर दिसतात पुरुष? संशोधन सांगतं...

Research on Aging : असं म्हणतात की मुली लवकर वयात येतात. मुलींची बौद्धिक क्षमता, शारीरीक घडणमध्ये लवकर बदल दिसून येतात. या तुलनेत मात्र पुरुषांमध्ये असे बदल फार दिसून येत नाही.

मात्र एका संशोधनात असं समोर आलंय की  पुरुष महिलांपेक्षा जास्त वयस्कर दिसतात. जरी स्त्री व पुरुष एकाच वयाचे असले तरी पुरुष प्रौढ वयात स्त्रीपेक्षा लवकर वयस्कर दिसतात. (men look older than women research said)

हेही वाचा: Romantic Women : पुरुषांपेक्षा महिला जास्त रोमँटीक का असतात?

फिनलँडच्या एका विद्यापीठाने केलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की स्त्रियांपेक्षा पुरुष लवकर वयस्कर दिसतात. या रिसर्चमध्ये 50 वर्षाच्या पुरुष आणि स्त्रीचं उदाहरण देण्यात आलंय. 50 वर्षांचा पुरुष व स्त्री या दोघांमध्ये जास्त वयस्कर हा पुरुष दिसतो.

म्हणजेच जवळपास चार किंवा पाच वर्ष पुरुष वयस्कर दिसतोय. यामागे या संशोधनात असं का होतं, याची कारणे सुद्धा स्पष्ट केली आहे. उदा. ताण-तणाव, धूम्रपान, आरोग्याकडे दुर्लक्ष, इत्यादी.

हेही वाचा: World Men's Day : भारतासह जगाच्या पाठीवरील मोस्ट पॉवरफुल पुरूष

विशेष म्हणजे या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी एपिजेनेटिक क्लॉकचा वापर केलाय. याद्वारे व्यक्तींचं बायमेट्रीक वय किती असावं, हे सांगितले जाते. संशोधनाच्या मते पुरुषांचं वय जास्त दिसणे हे वयाच्या 20 व्या वर्षापासूनच सुरू होतं. त्यामुळे मुली लवकर वयात येतात हा समज खरा आहे की खोटा, यावर प्रश्वचिन्ह निर्माण होतात.