

Retro Fashion Comeback in Nagpur | Gen-Z & Gen-Alpha Reviving Vintage Style
sakal
Gen Z Fashion Choices India: शहरातील फॅशनच्या जगतात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. पाश्चिमात्य फॅशनसोबतच भारतीय कपड्यांना पाश्चात्त्य पद्धतीने परिधान करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. रेट्रो' म्हणून ओळख मिळविलेल्या या कपड्यांना प्रचंड मागणी वाढली आहे.
नागपुरातील तरुण-तरुणी स्मार्टनेस, आत्मविश्वास आणि स्टाइल विथ कम्फर्ट याचा सुरेख मेळ साधत फॅशनचे नवे रंग शोधत आहेत. कपड्यांच्या फॅशनमध्ये नेहमीच बदल होताना दिसून येतो. गेलेली फॅशन ही पुन्हा नव्या स्वरूपात परत येत असते. पूर्वीची 'बेल बॉटम' स्टाइल आता पुन्हा येऊ लागली आहे. तरुणींकडून त्याचा विशेष वापर होताना दिसून येतो.