
Return gift ideas for wedding guests: लग्नसमारंभ म्हटलं की येतात ते कपडे, सजावट, खानपान आणि महत्त्वाचं म्हणजे पाहुणे. कारण सजावट आणि दिव्यांची रोषणाई या समारंभाला उजाळा देतातच पण लग्नात आलेलेच पाहुणे खऱ्या अर्थाने या समारंभात चार चांद लावतात. त्यांच्या हजेरीशिवाय साखरपुडा ते रिसेप्शन पर्यंतचा प्रवास अपूर्ण वाटतो.
हे पाहुणे तुमच्या लग्नात वेळात वेळ काढून हजेरी लावण्यासाठी उत्सुक असतात. मग कोणत्या कार्यक्रमात कोणते कपडे घालायचे, त्यावर कोणते दागिने घालायचे याचे नियोजनही करायला लागतात. त्यांची उपस्थिती ही वधू -वरासाठी मौल्यवान असते. त्यामुळे तुमच्या लग्नसमारंभाचा एक भाग झाल्याबद्दल, तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार मानण्यासाठी त्यांना एक रिटर्न गिफ्ट द्यायला विसरू नका.