घर सजवताना नवीन वस्तूंवर खर्च करण्याऐवजी जुन्या वापरलेल्या वस्तूंना नवीन रूप देऊनही सजावटीला वेगळा आयाम देता येतो. पुनर्वापर करून केलेली घरसजावट खर्चाची बचत करतेच, शिवाय ती तुमच्या घराला एक ‘वैयक्तिक टच’ही देते. पुनर्वापर कुठे कुठे करता येईल आणि काय करता येईल याबाबतच्या काही टिप्स बघूया.