Reuse Tips : तूटलेली चप्पल फेकून देण्याआधी हे वाचाच!

तूटलेल्या चप्पलेपासून फर्निचरसाठी बनवा पॅडिंग
reuse news
reuse news esakal

पुणे : वाटेत चालताना अचानक चप्पल तुटली तर सरळ तिला आपण कचऱ्यात फेकून देतो. काही लोक तर तूटलेली चप्पल देवळात सोडून तिथलीच चांगली चप्पल घालून येतात.पण, तूटलेल्या चप्पल फेकून न देता. त्याचे बरेच काही करता येते. जुनी चप्पल वापरून कंटाळा आला असेल तर ती पुन्हा नवी कोरी बनवता येते. ते कसे काय ? चला जाणून घेऊयात...

फर्निचरसाठी बनवा पॅडिंग

आपल्या घरात विविध प्रकारचे फर्निचर असते. ते सांभाळणे तसे कठिण असले तरी हौसेखातर आपण फर्निचर खरेदी करतच असतो. खुर्ची किंवा इतर जड फर्निचर शिफ्ट करताना ते सरकवत नेणे सोपे पडते. जेव्हा फर्निचर सरकवतो तेव्हा जमिनीवर स्क्रॅच पडतात. यामुळे टाईल्सची चमक जाते. हे होऊ नये यासाठी तुमची जुनी रबरी चप्पल खुर्च्या आणि इतर फर्निचरच्या पायांच्या आकारात कापा आणि त्या फर्निचरला चिकटवा. यामूळे फर्निचर आणि टाईल्स सेफ राहतील.

हँगिंग प्लाट स्टँड

तुम्हाला झाडांनी बाल्कनी सजवण्याची आवड असेल तर, यात तुमचे जुने चप्पल मदत करू शकते. तुम्ही इनडोअर प्लांटिंग करताना चप्पल उलट बाजूने अडकवून त्यात लहान आकाराच्या कुंड्या टांगू शकता. छोट्या गार्डनला वेगळा लुक देण्यासाठी हि बेस्ट आसडिया आहे. तूमची ही आयडिया अनेक मैत्रिणी फॉलो करतील.

चप्पलला द्या नवा लुक

तुमची चप्पल जुनी झाल्यामुळे ती घालायची इच्छा होत नसेल तर, चप्पलला नवीन लुक देण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमची जुन्या जीन्सचा एक तुकडा घ्या. तो चप्पलवर असलेल्या पट्टीच्या आकारात कापून घ्या. ग्लूच्या सहाय्याने पट्टीवर चिकटवा. या पट्टीवर काही फुले, डायमंड किंवा अॅक्सेसरीज चिकटवा आणि नवा लुक द्या.

स्टेटमेंट वॉल आर्ट

घराची सजावट करण्यासाठी जुन्या चप्पलचा वापर करता येतो. स्टेटमेंट वॉल आर्ट करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी चप्पलचा वापर करू शकता. जुन्या चप्पल रंगवून तुम्ही मार्करच्या मदतीने त्यावर एक पॉझिटीव्ह मॅसेज लिहू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com