हजारात सात जणांना रुमॅटॉईड आर्थरायटिस

औषधोपचारतून टाळता येते व्यंगत्व; पुरुषांच्या तुलनेत महिला दुप्पट
Rheumatoid arthritis - Symptoms and causes
Rheumatoid arthritis - Symptoms and causessakal

नागपूर : यांत्रिकीकरणामुळे शरीरिक श्रम कमी झाले. त्यातूनच रुमॅटॉईड आर्थरायटिससारखे आजार बळवले. हा एकप्रकारचा वातरोग. सांध्यांना दीर्घकालीन वेदना व दाह देणारा आहे. स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते. त्यातून संधीवात होतो. हजार व्यक्तींमध्ये सात लोकांना संधीवात आढळून येतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दोन पट अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मात्र यावर योग्य औषधोपचारातून अपंगत्व टाळता येते, अशी माहिती वातरोगतज्ज्ञ डॉ. परीक्षित सगदेव यांनी दिली.

दोन फेब्रुवारी रुमॅटॉईड आर्थरायटिस जागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. हा संधीवात कुठल्याही वयात होऊ शकतो; मात्र ४८ ते ६० वर्षे वयोगटात व्यक्ती अधिक प्रमाणात आढळतात. सांध्यांच्या लायनिंगवर(सायनोव्हियम) परिणाम होऊन त्यावर वेदनादायक सूज येते, लालसरपणा येतो. कालांतराने सांध्यांची झीज होते. यातून व्यंगत्व येण्याची शक्यता आहे. याशिवाय स्नायुबंध (टेंडन्स) व अस्थिबंध (लिगामेंट्स) कमकुवत होतात. सांध्यांचा आकार बदलू लागतो. संधीवात मुत्रपिंड, डोळे, फुप्फुसावर परिणाम करतो. रुमॅटॉईड आर्थराइटिसच्या वेदना कमी करता येत असून वेदनाशमन करण्यापुरते मर्यादित नाही. औषधोपचारातून पुढे होणारी हानी टाळता येते, असे डॉ. सगदेव म्हणाले.

ही आहेत लक्षणे

  • सकाळी होतात वेदना

  • सांध्यांमध्ये अकडण

  • सांधे लालसर होतात

  • सांध्यांवर सूज येते

  • थकवा जाणवतो

  • हाता-पायांना मुंग्या येणे

  • भूक कमी होते

''रुमॅटॉईड आर्थरायटिस दीर्घकाळाचा विकार आहे. वेळेत या रुग्णांनी औषधोपचार करणे आवश्यक आहे. विशेष असे की, हा विकार असलेल्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जीवनशैली संतुलित असावी. शरीरासोबत मनाची तयारी केल्यास या विकारावर मात करून सामन्य जीवन जगता येते.''

- डॉ. परीक्षित सगदेव, वातरोग तज्ज्ञ, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com