गायन हा माझा आवडता छंद आहे. घरात संगीतमय वातावरण असल्यामुळे लहानपणापासून माझ्यावर संगीताचे संस्कार झाले. मलाही संगीतविषयक आवड निर्माण झाली आणि पुढे तोच माझा छंदही बनला.
सध्या मी अभिनय क्षेत्रात काम करते; पण गायन हा माझा छंद प्रोफेशनमध्ये बदलला, रितसर मी प्रोफेशनली स्टुडिओमध्ये जाऊन गाऊ शकले तर ते फारच आवडेल, कारण ते माझं स्वप्नच आहे, असं म्हणायला हरकत नाही. शाळेत असताना मला चित्रकलेचाही छंद लागला.