Relationship Tips: पार्टनरसोबत दिवसाची सुरुवात करा 'या' 4 टिप्सने

सकाळची वेळ ही कपलसाठी खूप रोमँटिक असते
Relationship Tips
Relationship TipsEskal

दिल्ली : दिवसाची सुरुवात जर चांगली करायची असेल तर सकारात्मक गोष्टीने करा. यामुळे तुमचा दिवस छान जातोच शिवाय तुमच्या पार्टनरचा (Partner) ही दिवस चांगला जातो. सकाळची वेळ ही कपलसाठी खूप रोमँटिक असते. अशावेळी तुम्ही मॉर्निंग किस आणि हग करून तुमच्या जोडीदाराला खुश करण्याचा प्रयत्न करु शकता. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि फक्त तोच दिवस नाही तर पुढील अनेक दिवस तुम्हाला चांगले जातील. चला तर जाणून घेऊया अशा काही टिप्स.

Relationship Tips
Relationship Advice:लग्नाआधी करा 'या' गोष्टी, नंतर पश्चाताप नाही होणार

दिवसाची अशी करा सुरुवात

दिवसाची सुरुवात करताना सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जोडीदाराला छान स्माईल करत शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. शक्य झाल्यास जवळ घेऊन किस केले पाहिजे. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल. यामुळे तुमच्या सोबत पार्टनरचा दिवस सकारात्मक जाईल.

पार्टनरची प्रशंसा करा

तुम्ही जर पार्टनरची थोडी प्रशंसा केली तर त्याचाही आत्मविश्वास (Confidence) आणि आनंद वाढण्यास मदतच होईल. तुम्ही त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या मेहनतीबद्दल, त्यांच्या लूकबद्दल किंवा व्यक्तिमत्त्वाबद्दल (Personality) कौतुकाने भरभरुन बोला. यामुळे तो दिवसभर उत्साहाने आपले काम करेल. एवढेच नाही तर त्याची स्तुती तर कराच याशिवाय त्याच्या कामाविषयी, क्षमतेविषयी विश्वासाने बोला. त्याला अजून काम करण्याची आवड निर्माण होईल.

ब्रेकफास्ट सोबत बनवा

सकाळी किचनमध्ये चहा, ब्रेकफास्ट बनवताना त्याची मदत घ्या. स्वयंपाकघरात रोमँटिक मूडमध्ये ब्रेकफास्ट बनवा. सोबत काम केल्याने एकमेकांना वेळ देता येतो शिवाय मजाक- मस्तीमुळे एकमेंकावरील प्रेम अजून वाढेल. या सगळ्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एकत्र बसून नाश्ता करा. या क्षणाला अनुभवण्यासाठी तुम्हाला थोडं लवकर उठण्याची सवय करावी लागेल.

कामाच्या दबावाखाली हसायला विसरू नका

आपण दिवसभराच्या कामात इतके व्यस्त होतो की हसायला विसरतो. खरेतर दिवसाची सुरुवात मजेत करायला हवी. तुम्ही जर सकाळी मोकळेपणाने हसलात तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला जोक्स (Jokes)सांगून किंवा त्यांच्यासोबत मजा करून तुमची सकाळ आनंदी आणि ताजेतवाने करू शकता. असे केल्याने तुम्ही दिवसभर सकारात्मक राहाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com