
सोलापूर: तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही लग्नाची धामधूम सुरू आहे. केवळ शहरी भागात असलेले प्री वेडिंग आता ग्रामीण भागातही पोचले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही त्याची क्रेझ निर्माण झाली असून विवाह सोहळ्यात ते दाखवले जात नसले तरी आठवणी जपण्याकडे कल असल्याचे दिसत आहे.