Family
FamilySakal

नातीगोती : सकारात्मकता ठेवावी

मला असं वाटतं, की एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांविषयी आपुलकी व प्रेम वाटणं आणि एकमेकांसाठी त्याग करणं, या सर्व गोष्टींवर कुटुंबव्यवस्था अवलंबून असते.

- ऋषिकेश शेलार

मला असं वाटतं, की एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांविषयी आपुलकी व प्रेम वाटणं आणि एकमेकांसाठी त्याग करणं, या सर्व गोष्टींवर कुटुंबव्यवस्था अवलंबून असते.

माझी अर्धांगिनी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तिचं नाव स्नेहा आहे व नावाप्रमाणेच स्नेह निर्माण करते. तिच्यातला एक गुण म्हणजे कुठल्याही प्रसंगात ती सकारात्मकता ठेवते. आम्ही दोघं जेव्हा रुहीचे आई-बाबा झालो, तो प्रसंग माझ्या आयुष्यातला खूप सुंदर क्षण होता.

आम्ही नेहमी एकमेकांचा आदर करतो व आम्ही दीर्घकालीन भविष्यातील योजनांचा विचार करतो आणि आम्ही नेहमी त्यानुसार जगतो, हे आमच्या कुटुंबाचें वैशिष्ट्य आहे.

मी सध्या झी मराठी वाहिनीवर ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपतीची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणामुळे मी खूप व्यग्र असतो. त्यामुळे कुटुंबाला वेळ देणं अवघड जातं. मात्र, ज्यावेळी आम्ही सगळे एकत्र असतो, त्यावेळी आम्ही चुलीवर जेवण बनवतो- म्हणजे मटण आणि भाकरी, जे आम्हा सर्वांना आवडतं.

सहसा वाढदिवस आणि सण साजरे करण्यासाठी एकत्र येतो. एकत्र आल्यानं मजा येते. आम्ही गप्पा मारतो, गाणी गातो, खेळ खेळतो.

खरं सांगायचं झालं, तर अभिनय क्षेत्रात काम करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, की इतर कोणापेक्षा फक्त कुटुंबच आपल्याला पाठिंबा देऊ शकतं.

नातेसंबंध घट्ट ठेवण्यासाठी आणि नातं टिकवून ठेवण्यासाठी, एकमेकांशी पारदर्शकता, विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्या कुटुंबासाठी त्याग करणं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना वेळ देणं. त्यातून नातेसंबंध दृढ होतात.

नाती दृढ होण्यासाठी…

१) एकमेकांमध्ये पारदर्शकता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

२) कुटुंबातील सर्व व्यक्तींशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे.

३) कुटुंबात एकमेकांची काळजी घ्यावी. त्यातून प्रेम वाढतं.

४) प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतो. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र, जेव्हा वेळ मिळेल, तो कुटुंबाला आवर्जून द्यावा.

५) एकमेकांवर विश्वास ठेवणं, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, त्यातच सर्व गोष्टी अवलंबून असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com