Pooja Room Design Sakal
लाइफस्टाइल
दिवाणखान्यालगतचे देवघर
घरातील पूजाघर हे पवित्र स्थळ असते. उलट्या ‘C’ आकाराच्या जागेत कोरीव दगडी भिंतीसह सुंदर आणि वास्तुसमृद्ध देवघर साकारू शकता.
डॉ. राजश्री पाटील
प्रशस्त बंगला असावा आणि त्या बंगल्यात देवघरासाठीची मोठी जागा असावी, असे आपल्याला वाटत असते. ते शक्य होईलच असे नाही. जो नियंता आपल्याला घर देऊन त्याच्या सजावटीपर्यंतचे फळ देतो, त्याची खास जागा आपल्या मनात असतेच. सुदैवाने मोठ्या दिवाणखान्यालगत देवघराची जागा असेल, तर या जागेचे मूळचे स्थानमाहात्म्य आणखी वाढनिता येतं हे खर. इंग्रजी उलट्या ‘सी’ आकाराच्या देवघरासाठीच्या राखीव जागेत उत्तम कलात्मक मांडणी करता येते. देवघराची मागची संपूर्ण भिंत दगडी कोरीवकाम केलेली करता येते.

