
थोडक्यात:
कानातील मळ काढण्यासाठी काडी-बड्स वापरणे धोकादायक असून मळ आत ढकलू शकतो.
डॉक्टरांनी दिलेले ईअर वैक्स रिमूवल ड्रॉप्स सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहेत.
तीव्र वेदना, ऐकण्यात अडचण किंवा स्राव असल्यास त्वरित ENT डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ear Wax Removal: कान हे शरीरातील एक अतिशय महत्त्वाचे अवयव आहे आणि कानात मळ तयार होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. हा मळ कानाला बाहेरच्या धूळ, घाण आणि जीवाणूंपासून संरक्षण देतो. पण कधी कधी मळ खूप वाढल्याने कानात अडथळा निर्माण होतो, खाज सुटते किंवा वेदना होतात.