Safe Swimming
Safe SwimmingSakal

Safe Swimming: उन्हाळ्यामुळे स्विमिंग सुरू करताय? 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी

Safe Swimming: अनेक लोक उन्हाळ्यात पोहायला जातात. अशावेळी डोळ्यांची खास काळजी घेणे गरजेचे असते.
Published on

Safe Swimming how protect your eyes while swimming

उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध पद्धतींचा वापर करतात. काही लोक कुलर, एसीमध्ये बसून राहतात. तर काही लोक थंड पेये पितात. तर अनेक लोक स्विमिंगला जातात.

उन्हाळ्याच्या हंगामात लोक बऱ्याचदा वॉटर वर्ल्ड आणि स्विमिंग पूल सारख्या ठिकाणी भेट देतात. पण इथे बराच वेळ पाण्यात राहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होते. अशावेळी डोळ्यांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

पोहताना डोळ्यांची कशी काळजी घ्यावी

  • गॉगल घालावा

पोहताना डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गॉगल घालणे. गॉगल्समुळे डोळे थेट पाण्याच्या संपर्कात येणार नाही. जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की पोहताना गॉगल घातल्याने जलतरणपटूच्या डोळ्याचे विकार कमी झाले आहे.

  • आय ड्रॉप वापरावा

पाण्यातील क्लोरीनमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते. पोहण्याच्या आधी आणि नंतर एक खास आय ड्रॉपचा वापर केला जातो. यामुळे तुमचे डोळे ओलसर होणार नाही आणि संसर्गाचा धोका कमी होईल.

  • विश्रांती घ्यावी

पोहतांना अधुनमधून विश्रांती घ्यावी. यामुळे डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही. संशोधनात असे समोर आले की पोहताना नियमितपणे विश्रांती घेतल्याने डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि डोळ्यांवर ताण येत नाही. पोहताना प्रत्येक तासाला १० मिनिटांची विश्रांती घ्यावी.

Safe Swimming
Summer Skin Care: घाम, उन्हाच्या चटक्याचा त्वचेवर परिणाम, अशी घ्या खास काळजी
  • पोहण्यापूर्वी आंघोळ करावी

पोहण्यापुर्वी शरीराची स्वच्छता करावी. यासाठी स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी. यामुळे पाण्यातील बॅक्टेरिया कमी होतात.

  • डोळे चोळू नका

पोहताना डोळ्यांना खाज किंवा जळजळ होत असेल तर चोळू नका. डोळे चोळल्याने संसर्ग वाढू शकतो.

  • डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

वरील उपाय करून देखील डोळ्यांची जळजळ कमी झाली नाही तर डोळ्यांचा नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांवर उशीरा उपचार केल्यास दृष्टी जाऊ शकते. उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर वरील गोष्टींची काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com