

saharanpur wood craft history
esakal
भारतातील घरांमध्ये दिसणारे नक्षीदार लाकडी फर्निचर, देवघर, दरवाजे किंवा पलंगाचे कलात्मक हेडबोर्ड पाहिले की सहारणपूरच्या लाकडी कोरीव कामाची आठवण होते. पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या या हस्तकलेला 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट' (ओडीओपी) योजनेमुळे नवी ओळख मिळाली आहे. या उपक्रमामुळे हजारो कारागिरांना आपल्या गावातच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.